Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ ऑगस्ट, २०१९

अमळनेर तालुक्यात ३३ कोटी वृक्षलागवडीचे तीन-तेरा - अधिकारी व कर्मचारी वर्गाची उदासीनता.




श्यामकांत पाटील (उपसंपादक तरुण गर्जना)     

महाराष्ट्र शासनाने ३३ कोटी वृक्षलागवडीचा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी प्रशासनातील प्रत्येक कार्यालयातील अधिकारी ,कर्मचारी यांना जबाबदारी दिली आहे.  जिल्ह्यात परिणामी अमळनेर तालुक्यात   ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सादय होत नसल्याचे दिसून येत आहे. मागच्या वर्षी अमळनेर तालुक्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साद्य करण्यासाठी तत्कालीन तहसिलदार प्रदीप पाटील यांनी पुढाकार घेवून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साद्य  करण्यासाठी प्रयत्न केले होते .


 त्या पार्श्वभूमीवर अंबरीष महाराज टेकडी गृप अमळनेर व दहिवद विकास मंच यांच्या पुढाकाराने प्रशासन व लोकसहभागाच्या माध्यमातून हजारो वृक्षाचे रोपण एका मिनिटांत ११११ अंबरीष महाराज टेकडीवर  व एका मिनिटांत १००८  दहिवद विकास मंच तर्फे  गावांत वृक्षारोपण   केले   .त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी संपुर्ण महाराष्ट्रभर झाली  .महाराष्ट्राचा इतिहासात असा पर्यावरण पुर्वक कार्यक्रम पहिल्यांदाच घेण्यात आला . आज स्थितीत दहिवद विकास मंच व अंबरीष महाराज टेकडी गृप  यांनी  तालुक्यात दुष्काळ असतांना देखिल ९९% झाडे जगवली . त्यांच्या कार्यात ते यशस्वी झाले अश्या पर्यावरण प्रेमी संस्था व वृक्ष मित्र यांच्या मार्गदर्शनाने  तालुक्यात एकाच ठिकाणी एकाच वेळेस मोठे वृक्षारोपणाचे कार्य होणे अपेक्षित आहे. दहिवद विकास मंच व अंबरीष महाराज टेकडी गृपच्या कार्याची दखल घेत जानेवारी  महिन्यात अप्पर जिल्हाधिकारी जळगांव यांनी प्रशासनासोबत  वृक्षारोपणाच्या चर्चेत विकास मंच व टेकडी ग्रुपला सहभागी केले होते.

 
तालुक्यातील जिल्ह्यातील  तहसिल कार्यालय, पंचायत समिती ,वनविभाग ,सामाजिक वनीकरण ,आरोग्य विभाग ,शिक्षण विभाग अश्या सर्व शासकीय विभागांनी वृक्षारोपणाची प्रामाणिक  जबाबदारी पार पाडणे गरजेचे होते . अमळनेर तहसिल व पंचायत समिती आवारात लावलेल्या झाडांचे ड्डे देखिल मातीने पूर्ण भरलेले नाहीत .झाडाच्या पिशवीतील माती  तशीच उघडी असल्याने अमळनेर तहसिलदार  व गटविकास अधिकारी ३३ कोटी वृक्ष लागवडी बाबत किती गंभीर  आहेत हे यावरून दिसून येते.

 
तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागामार्फत ग्रामपंचायतीनां  पुरविण्यात आलेली रोपे पिशव्यांमधेच अर्धमेलेली असल्याने ते जगतील किती याबाबत शंका आहे ? रोप उतरवल्या नंतर किती ग्रामपंचायतीनी ती रोपे लावलीत याबाबत देखिल प्रश्न चिन्ह आहे ? यावर्षी प्रत्येक ग्रामपंचायतीला ३३०० झाडे लावण्याचे टार्गेट असतांना किती ग्रामपंचायतीनी हे टार्गेट पूर्ण केले ?   वृक्षारोपणाचा आढावा अमळनेर गटविकास अधिकारी व तत्कालीन तहसिलदार यांनी घेतला का ?  असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात असल्याने प्रशासन ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम किती प्रामाणिकपणे हाताळत आहे यावरून लक्षात येते .





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध