Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १७ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
*दोंडाईच्यात पन्नास लाखाचा लाखांचा विमल गुटखा जप्त* *दौलत सुर्यवंशी यांच्या आत्मदहनाच्या तक्रारीला दोंडाईचा पोलिसांचा न्याय*
*दोंडाईच्यात पन्नास लाखाचा लाखांचा विमल गुटखा जप्त* *दौलत सुर्यवंशी यांच्या आत्मदहनाच्या तक्रारीला दोंडाईचा पोलिसांचा न्याय*
दोंडाईचा प्रतिनिधी : दौलत सुर्यवंशी यांनी महाराष्ट्रात व धुळे, नंदुरबार जिल्ह्यात "विमल" नावाचा गुटखा गल्लोगल्ली राजरोसपणे विकला जात असुन, आजची पिढी व्यसनाधीन होऊन कॅन्सरसारख्या आजाराने रोज मरत आहे. म्हणून सरकारने ह्या गुटखा आणणाऱ्या व विकणार्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा पंधरा
ऑगस्ट रोज आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्या अनुषगाने दोंडाईचा पोलीस, व वरिष्ठ अन्न भेसळयुक्त अधिकाऱ्यांनी संबधित व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आश्वासीत केले. म्हणून त्यांनी आत्मदहनाचा निर्णय तूर्तास स्थगित केला.
याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस सो.,अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. ना. जयकुमार भाऊ रावल, अन्न व औषध प्रशासन आयुक्त, नाशिक, सह-आयुक्त, धुळे, जिल्हाधिकारी, धुळे, पोलीस अधीक्षक, धुळे आदींना तक्रारीची प्रत दिली. तक्रारीचा आशय असा की, महाराष्ट्र सरकारने राज्यात गुटखा बंदीचा निर्णय घेतला आहे. परंतु अन्न भेसळ प्रतिबंधक विभाग व पोलीस विभाग यांच्या कानाडोळामुळे महाराष्ट्रातील काही घाऊक व्यापारी जवळच्या गुजरात
राज्यातून गुटख्याची राजरोसपणे चोरटी वाहतूक करून किरकोळ व्यावसायिकांना हाताशी धरून महाराष्ट्रातील गल्लोगल्लीत, खेड्यापाड्यात हा जीवघेणा विषारी गुटखा जनतेपर्यंत पाठवत आहे. म्हणून आपण जो स्वताचे शंभर कोटी राजस्वचे नुकसान करत, अडोतीसशे कोटी रुपयांची उलाढालीचा व्यवसाय बंद केला होता. आता तो व्यवसाय अवैध मार्गाने बात्तरशे कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. आज महाराष्ट्रातील तरुणाई लाखोंच्या संख्येने व्यसनाधीन होऊन चालली असून अनेक तरूण रोज कॅन्सरसारख्या भयंकर
आजाराने मुर्त्यूमुखी पडत आहे. म्हणून आपण महाराष्ट्रात व खासकरून धुळे व नंदुरबार जिल्ह्यात गुटखा कायमस्वरूपी बंद करावा अन्यथा मी पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करू असा ईशारा दिला होता. त्याअनुषगाने शासनाच्या प्रतिनिधींनी व पोलीस प्रशासनाने तेरा ऑगस्टपासून तक्रारीची दखल घेत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी दोंडाईचा पोलिसांनी "विमल व इतर तत्सम गुटख्याची" जी. जे -22-7778 क्रमांकाची आयशर गाडी पकडली. त्यात त्यांना गाडीच्या किमंतीसह अठ्ठेचाळीस लाख चाळीस हजारांचा विमल गुटखा, सुगंधीत तंबाखू, सागर नावाचा गुटखा आदी माल मिळून आला. याबाबत दोंडाईचा पोलीस स्टेशनला आज दिनांक १७ ऑगस्ट रोजी अन्न भेसळयुक्त सुरक्षा अधिकारी श्री
आनंद भाऊराव पवार वय वर्षे (36) यांनी फिर्याद दाखल दिली असुन आरोपी कुर्ष्णा मगन वळवी(गाडीचालक), विरूभाई धीरुभाई तडवी (किल्नर), राजेंद्र सोनी (गाडीमालक ), मनोहरभाई नारायणभाई पवार(मालदेणार), शंकर मनोहर खत्री (मालघेणार)आदी सहाजणांनवर अन्न भेसळ सुरक्षा मानके प्रतिबंधक भारतीय कायदा कलम 328, 188, 272, 273, 34 अन्वये कलम 2006 26/2 I've 30,2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच दोंडाईचा पोलिसांनी केलेल्या बेधडक कारवाईमुळे गावातील व धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील अवैध गुटखा वाहतुक, विक्री करणार्यांचे धाबे धणाणले असुन, त्याचा आधारस्तंभ "विमल किंग" उर्फ शंकू खत्रीवर "गुन्हा दाखल झाल्यामुळे एकूणच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा सापडून, गुन्हा दाखल होण्याची पहिलीच घटना असुन गावातील सर्व स्तरातून दोंडाईचा पोलिसांच्या कारवाईचे कौतुक केले जात आहे....
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा