Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

*पालावरच्या शाळेवर रक्षाबंधन उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला*







रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या नात्याचा ऋणानुबंध व्यक्त करण्याचा आहे, बहिण भावाला राखी बांधते त्याबदल्यात भाऊ आपल्या बहिनीची रक्षा करण्याचे वचन देतो असाच उत्सव नळदुर्ग येथील मरगम्मा वस्ती येथे साजरा करण्यात आला. 

समाजापासुन वंचित असणारा घटक म्हणून मसनजोगी, वैदु या समाजाकडे पाहिल जाते या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी दरवर्षी रक्षाबंधन उत्सव त्यांच्या वस्ती वर जाऊन त्यांच्या पालावर साजरी करण्यात येतो, यावर्षीच्या उत्सवाला धाराशिव जिल्हा प्रचारक परमेश्वर निमडगे, श्री विशाल डुकरे व श्रमिक पोतदार तसेच वस्ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत रक्षाबन्धनाचा कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी श्री निमगडे यांनी वस्ती पाहणी केली मुलासोबत गप्पा मारल्या तर मुलाना गीत ही शिकवले, मुलांना खाऊ वाटप ही करण्यात आले. सुत्रसंचलन गटप्रमुख मीरा मोटे यांनी केले तर आभार श्री गजानन कुलकर्णी यांनी मानले यावेळी विद्यार्थ्यांच्या सोबत वस्तीतील नागरिक व शिक्षिका वर्षा सोमवसे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध