Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ ऑगस्ट, २०१९
थाळनेर पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे पोलीस ठाण्याच्या परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली आज जेसीबी व सहकाऱ्यांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
ठाणे परिसराच्या जागेचा योग्य उपयोग होणे गरजेचे आहे व कर्तव्याच्या ठिकाणी अस्वच्छता असणे बरोबर दिसत नाही. यामुळे परिसर प्रसन्न व प्रशिस्त ठेवणे गरजेचे असल्याने आज स्वच्छता मोहीम राबविली. याजागेवर एक जॉगिंग ट्रॅक तयार करून येथे विविध पध्दतीचे वनस्पती व शोभेचे वृक्षलागवड करून ठाणे परिसर अधिक सुशोभित करू असे मत थाळनेर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सपोनि सचिन साळुंखे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी स पो नि सचिन साळुंखे, कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंचचे प्रमुख योगेश्वर मोरे, सदस्य सचिन मोरे, असई पारधी, हे कॉ शेख, पो ना सोनवणे, पो कॉ बागुल, पो कॉ आव्हाळ, पो कॉ आळंदे, पो कॉ जाधव, पो कॉ खाटीक, पो कॉ मालाचे, पो कॉ आढावे, एलपीसी जाधव, मोरे, दिवेकर, सोनवणे, पवार, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा