Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २५ ऑगस्ट, २०१९
कुरखळी शाळेत अनोखा दहीहंडी उत्सव
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी गोपाळकाल्याचे औचित्य साधत अक्षरकार्ड, शब्दकार्ड संख्याकार्ड , प्रश्नावली, चॉकलेटने भरलेली दहीहंडी फोडून अनोख्या पद्धतीने दही हंडी उत्सव साजरा केला. पारंपरिक संस्कृतीचे जतन करत उत्सवाचा आनंद घेत ज्ञानार्जन करून उत्सव साजरा करण्यात आला. वेगळ्या पद्धत्तीने दहीहंडी साजरी केल्यामुळे विद्यार्थ्यांनीही चांगलीच मजा लुटली.
शाळेतील शिक्षिका योगिता नेरकर यांच्या कल्पनेतून व मुख्याध्यापक रघुनाथ गित्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.
यावेळी सावळदे केंद्रप्रमुख एम बी देवरे साहेबांनी बालगोपालांना पाचशे रुपयाचे रोख बक्षीस दिले.
शाळेत नेहमीच गावकरी व समितीच्या सहभागाने असे सहशालेय उपक्रम राबवले जात असतात त्यात वनभोजन, क्षेत्र भेट, शेतीकामे प्रात्यक्षिक, गावातील घरगुती छोटे व्यवसाय माहिती इत्यादी.
यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम कोळी, शिक्षणतज्ज्ञ सदस्य पोपटराव शिरसाठ, जि प मराठी शाळेचे शिक्षक व सर्वांचे मार्गदर्शक ज्ञानेश्वर माळी सर यांचेही सहकार्य लाभले.
याप्रसंगी कुरखळी ग्रामस्थ, अंगणवाडी शिक्षिका, मदतनीस व आशा सेविका उपस्थित होत्या.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
धुळे प्रतिनिधी - स्व.सुताम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापिका ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा