Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ४ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
नाशिक मधील पुरस्थिती गंभीर. पुढील २४ तासात मुसलधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून माहीती म्हणून जिल्ह्यात मिल्ट्रीला पाचारण. रेड अलर्ट
नाशिक मधील पुरस्थिती गंभीर. पुढील २४ तासात मुसलधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून माहीती म्हणून जिल्ह्यात मिल्ट्रीला पाचारण. रेड अलर्ट
प्रतिनिधी (नाशिक) नाशिकचे गंगापूर धरण 90 टक्के भरल्यामुळे विसर्ग 12 हजार क्यूसेक ने वाढवून 36 हजारापर्यंत नेण्यात आला आहे. शहराला जोडणारे सर्व पुलांवरून पाणी वाहत असल्याने सिडको, वडाळा, इंदिरानगर, पंचवटी आदी
उपनगरांचा शहराशी संपर्क तुटला. दुतोंडया मारुती बुडाला असून नारोशंकरच्या घंटेला पाणी लागले आहे. सरकार वाड्याच्या तिसऱ्या पायरीपर्यंत पाणी पोहोचले आहे. महापुराचा धोका दिसतोय.
रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली असून कसारा व इगतपुरी रेल्वे स्थानकांवर दुरांतो व मंगला एक्सप्रेस अडकून पडलेल्या आहेत. राज्यराणी, सेवाग्राम, गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली असून सकाळी इगतपुरीपर्यंत गेलेली पंचवटी एक्सप्रेस आता पुन्हा मनमाडकडे परत पाठविण्यात येत आहे.
मुंबई महामार्गवर पाणी साचल्याने वाहतूक काही ठिकाणी थांबविण्यात आली आहे. पेठ सुरगाणा या आदिवासी पट्ट्यातही विक्रमी पाऊस सुरू असल्याने तेथील खेड्यापाड्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे, सर्व नद्या नाले ओसंडून वाहत आहेत, त्यामुळे रस्ते जागोजागी बंद झाले आहेत
सोमेश्वर, त्रंबकेश्वर येथील दुगारवाडी, इगतपुरी येथील भावली धबधबा परिसरात पर्यटकांना बंदी. पाहिने, पेगलवाडी नेकलेस धबधबा परिसर देखील
वनविभागाने निर्मनुष्य केला आहे
कृपया नाशिककरांनी घराबाहेर पडण्याचा धोका स्वीकारू नये तसेच अन्य ठिकाणच्या बांधवानी यांचे नाशिक किंवा मुंबईकडे प्रवासाचे नियोजन असल्यास ते रद्द करणे योग्य राहील
नाशिकला महापुराचे संकेत; नारोशंकर मंदिराचे छत बुडाले
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा