Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ८ ऑगस्ट, २०१९
शिंदखेडा शहरात काँग्रेस मोठा धक्का
शिंदखेडा प्रतिनिधी शहरातील कॉंग्रेसचे माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, जनता विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील, माजी नगरसेवक सुरज देसले, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा कलावती माळी, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष विजय महाले, माजी प स सदस्य राजेंद्र पहाडी यांच्यासह कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, कामराज निकम, बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, साक्री बाजार समितीचे सभापती पोपटराव सोनवणे, मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, भाजपाचे तालुकाध्यक्ष नथा पाटील, संजीवनीताई सिसोदे, संजय संघवी, सुभाष माळी, भिला माळी, युवराज माळी, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, अशोक देसले, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, सर्व नगरसेवक उपस्थित होते.
माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख हे माजी प स सभापती व शिंदखेडा शहरातील कॉंग्रेसचे प्रमुख नेते सुरेश देसले यांचे भाचे आहेत. देशमुख यांच्या आई मालती देशमुख या नगरपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या. तसेच मनोहर पाटील हे कॉंग्रेस नगरसेविका मीराबाई पाटील यांचे पती आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा