
अशी देशद्रोही विधाने करणार्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !
नवी देहली – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशातील काही राज्यांमध्ये नेहमीच नागरिकांच्या विरोधात सैन्य तैनात करण्यात आले आहे. काश्मीर, मिझोराम, नागालॅण्ड, पंजाब आणि गोवा या राज्यांमधील नागरिकांनी बंड केले, तेव्हा सरकारने सैन्याचा वापर केला; मात्र पाकसारख्या देशात असे कधीही घडले नाही. हिंदु देश म्हणून ओळखल्या जाणार्या लोकशाही देशात मात्र हे घडले आहे, असे राष्ट्रघातकी विधान लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अरुंधती रॉय यांनी एका कार्यक्रमात केले, यावरून त्यांच्यावर सामाजिक माध्यमांवरून (सोशल मिडियावरून) टीका होत आहे.
रॉय यांच्या विधानावर कॅनडातील पाक वंशाचे ज्येष्ठ लेखक तारेक फतेह यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, अरुंधती रॉय म्हणतात, पाक त्यांच्या सैन्याचा वापर जनतेच्या विरोधात करत नाही. त्या आंधळ्या आणि बहिर्या आहेत का ? वर्ष १९७१ मध्ये काय घडले त्यांना माहीत नाही का? त्यांना बलुचिस्तानची स्थिती ठाऊक नाही का? त्या पाकच्या आयएस्आयने लिहून दिलेले पत्रक वाचत असल्यासारखे वाटते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा