Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ ऑगस्ट, २०१९

अर्थे येथे आदिवासी दिन साजरा,डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते फलकाचे उदघाटन





शिरपूर:प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील अर्थे येथे दि ११ रोजी विर एकलव्य मित्र मंडळातर्फे आदिवासी दिन साजरा करण्यात आला.संपूर्ण गावात मिरवणूक काढत आदिवासी दिन साजरा करण्यात आला.यावेळी विर एकलव्य भिल समाज यांच्या फलकाचे उदघाटन डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

शिरपूर तालुक्यातील अर्थे येथे आदिवासी दिन साजरा करण्यात आला होता.विर एकलव्य मित्र मंडळातर्फे अर्थे येथे आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संपूर्ण अर्थे गावात मिरवणूक काढण्यात आली.गावातील दोन ठिकाणी विर एकलव्य समाजाच्या फलकाचे 

उदघाटन करण्यात आले.फलकाचे उदघाटन डॉ जितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.तर यावेळी शशांक रंधे,दिपक गुजर,विजय पाटील,सुनिल भिल,विनोद पाटील आदी जण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी समाजातील महिला,अबाल व्रुध्दांसह तरूण मित्र मंडळी उपस्थित होते. संपूर्ण गावात मिरवणूक काढत आदीवासी दिन साजरा करण्यात आला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध