Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ ऑगस्ट, २०१९
Home
/
Unlabelled
/
उस्मानाबादमधील दुष्काळ लपवण्याचे प्रयत्न, चारा छावण्या घटवल्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश दुर्लक्षित
उस्मानाबादमधील दुष्काळ लपवण्याचे प्रयत्न, चारा छावण्या घटवल्या, मुख्यमंत्र्यांचे आदेश दुर्लक्षित
उस्मानाबाद : प्रतिनिधी( विशाल डुकरे ) पावसाअभावी उस्मानाबदसह मराठवाड्यातील अनेक जिल्हे कोरडेठाक आहेत. उस्मानाबदमधील भीषण दुष्काळ लपवण्यासाठी उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कामाला लागल्याचं समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या चारा छावणी मुदतवाढ आदेशाला उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने केराची टोपली दाखवली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील चारा छावणीतील 60 हजार जनावरांच्या चारा प्रश्न गंभीर बनला असून, प्रशासनाच्या दबावामुळे 70 पैकी केवळ 15 चारा
छावणी सुरू आहे.उस्मानाबाद जिल्ह्यात यंदा 81 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. जिल्ह्यात जुलैअखेर 159 गावात 211 टँकर सुरू होते. 17 मध्यम प्रकल्पात 0 टक्के पाणीसाठा, तर 205 लघु प्रकल्पात 1 टक्के पाणी शिल्लक आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागते. मात्र तरीही प्रशासन कागदोपत्री दुष्काळ लपविण्यासाठी कामाला लागले आहे.प्रशासनाच्या या आडमुठे धोरणामुळे उस्मानाबादचे पालकमंत्री तथा जलसंधारण मंत्री
तानाजीराव सावंत यांनी स्वातंत्र दिनाच्या कार्यक्रमात प्रशासनाला सरकारच्या आदेशाची आठवण करुन दिली. त्यानुसार 31 ऑगस्टपर्यंत चारा छावणी सुरू ठेवण्यास बजावलं. मात्र त्याचा फारसा फरक पडलेला नाही.उस्मानाबाद जिल्ह्यात प्रशासनाकडून सुरू असलेल्या या
कारभाराबाबत, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी गप्प आहेत. सर्व जण आगामी विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत व्यस्त आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा