Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०१९
*आरंभच्या वतीने "हरित नळदुर्ग" चे संकल्प राबवून स्वातंत्र्य दिन साजरा*
प्रतिनिधी( विशाल डुकरे) दि 15 ऑगस्ट रोजी नळदुर्ग शहरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत शाळेच्या प्रभातफेरी काढण्यात आले होते तर काही ठिकाणी खाऊ वाटप केले पण स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी आरंभच्या वतीने वेगळाच उपक्रम आयोजित केला होता, शेजारीच असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर-सांगली पुराच्या तडाख्यात सापडला असताना
मराठवाड्यात मात्र दुष्काळाची परिस्थिती आहे याचे प्रमुख कारण पर्यावरणाची निगा न राखणे हे आहे. मराठड्यातील नळदुर्ग हे ऐतिहासिक अन धार्मिक वारसा असलेलं शहर असून येथील पर्यावरणाच्या रक्षणासाठी महाराष्ट्र सरकारच्या 2019 च्या 33 कोटी वृक्ष व नळदुर्ग न.प.च्या वृक्ष लागवड या मोहिमेत सहभाग घेत आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्था नळदुर्ग च्या वतीने हरित नळदुर्ग या संकल्पाअंतर्गत तहसीलदार शिंदे, समाजसेवक राजाभाऊ माने, युनिटी मल्टीकॉन्स चे कफील मौलवी, जेष्ठ पत्रकार विलास येडगे, नगरसेवक नितीन कासार यांच्या हस्ते नळदुर्ग शहरातील एक व्यक्तीला एक झाड दत्तक दिले तसेच शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले ज्यामध्ये नळदुर्ग बस स्थानक येथे जवळपास 50 झाडांचे वृक्षारोपण केले तसेच ठिबकसिंचन द्वारे झाडांना पाण्याची सोय केली.
यावेळी वृक्षारोपण व रोपांचे वाटप असे एकूण 550 वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले, नळदुर्ग मधील सर्व प्रतीष्टीत नागरिक, राजकीय नेते, पोलीस अधिकारी, माजीसैनिक, व्यापारी, तरुण वर्ग, शालेय शिक्षक, विद्यार्थी या सर्वाना नळदुर्ग किल्ल्यातील ध्वजारोहण झाल्यानंतर नगरसेवक बसवराज धरणे, विनायक अहंकारी,माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, सुशांत भूमकर, पत्रकार तानाजी जाधव, मुस्ताक कुरेशी,
माजीसैनिक विद्याधर वाघमारे, इमाम शेख, सचिन डुकरे, अॅड.धनंजय धरणे, दीपक डुकरे, सुनील उकंडे, अमोल हजारे, महेंद्र डुकरे, रियाज शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत रोपांचे वाटप व वृक्षारोपण करून समाजाला पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला गेला. हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष राहुल हजारे, उपाध्यक्ष विशाल डुकरे, सचिव श्रमिक पोतदार, सहसचिव अभय हजारे, प्रसिद्धीप्रमुख आयुब शेख, कोषाध्यक्ष सागर हजारे, हरिदास बेले, कैलास घाटे, मयूर महाबोले, मयूर पाटील, सुजय
बिस्वास, अभिषेक आवटे, सुमित यादगिरे, अनिल जाधवर आदींनी परिश्रम घेतले तसेच या आरंभ आयोजित हरित नळदुर्ग संकल्पला शहर वासीयांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसादाबद्दल शहरवासीयांचे व नळदुर्ग नगरपालिका प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा