Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १२ ऑगस्ट, २०१९
फैजापूर येथील दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरीमातेचे जागृत देवस्थान
प्रतिनिधी (राजु तडवी )फैजापूर येथील दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरीमातेचे जागृत देवस्थान असून यात्रोत्सव निमित्त सालाबाद प्रमाणे दि १३ रोजी सायंकाळी सहा वाजता फैजपूर शहरात परंपरागत पद्धतीने बारागाड्या भगत संजय सेवकराम कोल्हे हे ओढतील.
यावेळी बारागाड्या ओढण्यासाठी असंख्य भक्तगणांची साथ लाभणार आहे. बारागाड्या शहरातील अंकलेश्वर
ब-हाणपूर मार्गावरील म्युनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक पर्यंत ओढल्या जातात. यावेळी पोलीस प्रशासन सज्ज
असते. मरीमातेचा परिसर नगरसेवक प्रभाकर सपकाळे यांनी पेव्हरब्लॉक दलित वस्ती निधीतून बसवण्यात मोठा हातभार लावला आहे. लवकरच सभामंडप
उभारण्यात येणार असल्याचे प्रभाकर सपकाळे यांनी सांगितले. मरीमातेच्या जयघोषाने भक्तांचा मळा फुलणार आहे. पुरातन काळात फैजपूर गावात कॉलरा ची साथ व इतर संकटे आली होती मरिमातेच्या चरणी पार्थना करून त्याकाळी नाहीसे झाली. तेव्हा पासून बारागाड्या ओढण्याची परंपरा आजही कायम आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा