Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ सप्टेंबर, २०१९
विशेष दर्जा देणारं नव्हे तर भेदभाव करणारं होतं कलम 370 - अजित डोवाल
________________________________
भारताने दहशतवाद्याच्या मुद्द्यावरुन पाकिस्तानला कडक इशारा दिला आहे. पाकिस्तानकडे फक्त दहशतवाद हेच शस्त्र आहे. त्यामुळे पाकिस्तानचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालयांनी सांगितले आहे. जम्मू-काश्मीरमधील जनता केंद्र सरकारच्या निर्णयासोबत आहे. येणाऱ्या काळात राज्यात नव्या संधी निर्माण होतील. राइट टू एज्युकेशन, राइट टू प्रॉपर्टी यांसारखे 106 कायदे, जे कलम 370 मुळे जम्मू-काश्मीरमध्ये लागू होत नव्हते. कलम 370 विशेष दर्जा नव्हे तर भेदभाव होता. काश्मीरमधील सध्या परिस्थिती वेगाने सुधारत आहे. सध्याच्या स्थितीत काश्मीरी नागरिक एखाद्या ठिकाणी एकत्र आले, तर त्याचा फायदा दहशतवाद्यांना होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षेच्या कारणामुळे काही निर्णय घेण्यात आले असल्याचे अजित डोवालयांनी सांगितले. सीमेपलीकडून दहशतवादी कारवायांचे निर्देश देण्यात आले आहेत. सीमेपासून 20 किलोमीटरवर पाकिस्तानचे कम्युनिकेशन टॉवर आहेत. त्यांच्या संवादातून महत्वाची माहिती मिळाली आहे. तसेच, पाकिस्तानमध्ये 230 दहशतवादी सक्रिय आहेत. त्यातील काही जणांना अटक करण्यात आली आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत, असे अजित डोवाल यांनी सांगितले. याचबरोबर, अजित डोवाल यांनी सोपोरमध्ये जखमी झालेल्या अडीच वर्षांच्या मुलीला एम्समध्ये घेऊन जाण्याचे निर्देश दिले आहेत.
नाशिकच्या एपीआय, तीन हवालदारांना लाच घेताना औरंगाबादेत अटक
________________________________
अटकेतील आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना नाशिक मधील आडगाव ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस हवालदारांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने औरंगाबादेत रंगेहात अटक केली. ही कारवाई ६ सप्टेंबर रोजी रात्री चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत करण्यात आली.सहायक पोलीस निरीक्षक योगेश चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक अनिल दामाजी केदारे, पोलीस नाईक मिथून किसनराव गायकवाड आणि पोलीस शिपाई प्रदीप कचरू जोंधळे अशी अटकेतील पोलिसांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांनी सांगितले की, चिकलठाण्यातील चौधरी कॉलनी येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेचा भाऊ कैलास काकडे विरोधात नाशिकमधील आडगाव पोलीस ठण्यात गुन्हा दाखल झाला होता.या गुन्ह्यात कैलासला अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील हे अन्य तीन कर्मचारी यांचे पथक आरोपी कैलासला घेऊन औरंगाबादेत आले होते. तत्पूर्वी पोलीस नाईक केदारे यांनी तक्रारदार यांना फोन करून तुमच्या भावाला अटक झाली आहे. त्याला अन्य गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच पुढे मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याविषयी महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. दरम्यान शुक्रवारी रात्री सपोनि पाटील आणि अन्य कर्मचरी आरोपी कैलासला घेऊन औरंगाबादेतील चौधरी कॉलनीत आले. याविषयी माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चौधरी कॉलनीत दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यावेळी सपोनि योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाच मागणी केली तेव्हा तक्रारदार यांनी चार हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. तेव्हा सर्वांनी संगणमत करून लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या भावाकडे देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी त्यांच्या भावाकडे लाचेचे चार हजार रुपये दिल्यानंतर आरोपी पोलिसांनी कैलासकडून लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सपोनि पाटील आणि अन्य पोलीस हवालदारांना रंगेहात पकडले. सर्व आरोपीपोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
बचत गटाच्या महिलांना एक लाखाचं कर्ज देणार - मोदी
________________________________
बचत गटामुळे महिलांनी गावांना आर्थिक ताकददिली आहे. परिणामी देशाची आर्थिक ताकद वाढत आहे. ही चळवळ अधिक बळकट करायची आहे. यासाठी बचत गटातील महिलांना १ लाखाचे कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. ते ऑरिक हॉल, कमांड कंट्रोल सेंटर, रोड सिस्टिम नेटवर्क, लॅण्डसिस्टम आणि अॅमेनिटीजच्या लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी बचत गटाच्यासक्षम महिलांच्या मेळाव्यात ते बोलत होते.देशाच्या ओद्योगिक गतीचे नवकेंद्र हे औरंगाबाद होत असून येणाऱ्या काळात येथे अनेक उद्योग सुरु होतील. याच्या माध्यमातून मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा आशावादही मोदी यांनी येथे व्यक्त केला. ऑरिक सिटीच्या कंट्रोल रुमच्या लोकार्पणाचा आजचा दिवस मराठवाड्यासाठी क्रांतिकारी आहे. ऑरिक सिटीमध्ये मोठ्याप्रमाणावर उद्योग येत आहेत. यात मोठी गुंतवणूक होत असून यातून मराठवाड्यात रोजगार उपलब्ध होत आहे. मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्त करणारी वॉटर ग्रीड योजना कौतुकास्पद आहे. यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल असेही प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. मात्र, मराठवाड्यासाठी आणि येथील उद्योगांसाठी कोणतीही मोठी घोषणा यावेळी झाली नाही.
काय आहे ऑरिक सिटी ?
३० लाखांपर्यंत रोजगार निर्मितीचे लक्ष्य येथील उद्योगनगरीतून आहे. देशातील अत्याधुनिक सुविधांचे नवीन औद्योगिक शहर म्हणजे ऑरिक असेल. ऑरिकमध्ये ऑटोमोबाईल्स क्षेत्र विकसित करण्यासाठी उद्योग खात्याच्या प्रधान सचिवांना सवलती देण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत. उद्योग येण्यासाठी ज्या सवलती दिल्या जाव्यात. त्यासाठी उपसमिती गठित केली आहे. त्या समितीलादेखील अधिकार आहेत. केंद्रीय कॅबिनेटने डीएमआयसीसाठी ८ हजार कोटींच्या निधीबाबत मागेच निर्णय घेतला आहे. ३ हजार कोटींचा निर्णय २०१५ मध्येच झाला होता. अंदाजे ८०० कोटींचा निधी ऑरिकसाठी मिळालेला आहे. पहिला टप्पाच अजून पूर्ण झालेला नाही. ऑक्टोबर २०१८ पर्यंत शेंद्रा नोडचे काम पूर्ण होणार होते; परंतु ते झाले नाही. बिडकीनमधील काम २०१८ मध्ये सुरू झाले आहे. २०२० मध्ये पहिला टप्पा, २०२१ मध्ये दुसरा टप्पा, २०२२ मध्ये तिसरा टप्पा, असे काम होणार आहे.
भारताच्या राष्ट्रपतींना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही- पाकिस्तान
________________________________
भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमच्या हवाई हद्दीतून जाऊ देणार नाही, अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे.रामनाथ कोविंद आईसलँडच्या दौऱ्यासाठी जाणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी एअरस्पेस उघडणार नाही, अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी याबद्दलची माहिती दिली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 17 सप्टेंबरपासून आईसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनियाच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. भारताचे राष्ट्रपती आईसलँडच्या दौऱ्यावर जाणार आहेत.त्यांच्या विमानाला पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाता यावं, यासाठी भारताकडून परवानगी मागण्यात आली होती. मात्र पाकिस्ताननं कोविंद यांना परवानगी नाकारली, अशी माहिती कुरेशींनी सरकारी वृत्तवाहिनी असलेल्या पीटीव्हीला दिली. पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. फेब्रुवारीत भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राइक केला होता. पाकिस्तानच्या हद्दीतील जैश-ए-मोहम्मदच्या सर्वात मोठ्या दहशतवादी तळांवर हवाई दलानं हल्ला चढवला होता. त्यानंतर पाकिस्ताननं एअरस्पेस बंद करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये हे निर्बंध काहीसे शिथिल केले होते. मात्र भारतासाठी निर्बंध कायम ठेवण्यात आले. त्यामुळे भारतीय विमान कंपन्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा