Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ सप्टेंबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
श्रीमती शरचन्द्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील बेकायदेशीर आंदोलनाचा निषेध :--प्राचार्य व्ही एन बोरसे.
श्रीमती शरचन्द्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील बेकायदेशीर आंदोलनाचा निषेध :--प्राचार्य व्ही एन बोरसे.
चोपडा :प्रतिनिधी विनोद निकम येथील श्रीमती. शरचन्द्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि ७ रोजी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी प्राचार्य व्ही एन बोरसे व त्यांचे सर्व सहकारी हजर होते. सदरचे तंत्रनिकेतन महाविद्यालय हे विनाअनुदानित आहे त्यामुळे अडचणी येत आहेत, हल्लाबोल करणारे कर्मचारी संस्थेची बदनामी करीत आहेत.
ह्या काही निवडक लोकांमुळे युनिट बंद होण्याच्या मार्गावर आहे ज्या ज्या ठिकाणी टॅफ नॅप संघटना गेली तेथील महाविद्यालय बंद पडत आहेत.या लोकांनीच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडे तक्रारी केल्याने महाविद्यालयाची प्रथम,द्वितीय वर्ष प्रवेश मान्यता काढून घेतल्याने यामुळे 60 कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका बसला असून त्यांचे संसार उलट उघड्या वर येणार आहेत. शासकीय नियमानुसार वेतन द्यायचे म्हटले तर काय करावे लागते ते त्यांना माहीत नाही काय.?स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देऊन जगापुढे चुकीचा चेहरा मांडत आहेत.यांनी यावर्षी प्रवेश प्रक्रियेत अडथळा आणला म्हणून भरपूर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही हल्लाबोल करणारे कर्मचारी यांची दुटप्पी भूमिका आहे एका बाजूस संस्थेकडून वेतन काढण्याचा प्रयत्न करतात तर दुसऱ्या बाजूस न्यायालयात जातात.संस्थेची आर्थिक स्थिती नसतांना पैसे द्यायचे कुठून.?यातील काही कर्मचारी तर असे आहेत की,काम न करता वेतन लाटले आहे.जिथे काहीच साहित्य, इमारत,सोयी सुविधा नाहीत त्याठिकाणची तंत्रनिकेतन व्यवस्थित सुरू आहेत परंतु चोपडा तंत्रनिकेतन ची भव्य इमारत, सर्व सोयी सुविधा असूनही तक्रार दिल्याने महाविद्यालया पुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत.यांचाच महाविद्यालय बंद पाडण्याचा डाव आहे.यांनी दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या पोटावर पाय दिलेत.दरवर्षी शासनाकडून स्कॉलरशिप मिळत नसल्याने ती मिळावी यासाठी खंडपीठात याचिका दाखल केली आहे व अतीरिक्त असलेल्या कर्मचार्यांची बाब ही न्यायप्रविष्ट असल्यामुळे सदरचे आंदोलन हे चुकेचे आहे.अशी माहिती प्राचार्य व्ही एन बोरसे यांनी दिली.यावेळी उपप्रार्चाय एन आर शिंदे,प्रा.एस ई शिसोदे,किरण खंडाकळे, एस एम पाटील,प्रमोद देशमुख,शशिकांत पाटिल,अजय बडगुजर,शैलेश सूर्यवंशी,मनोज पाटील,संजय पाटील,यशवंत पाटील,कैलास सूर्यवंशी, मनोहर पाटील,जितू चावरे,कपिल कदम,नितीन देशमुख, समाधान पाटील आदी होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा