Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १५ सप्टेंबर, २०१९
हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी जिल्ह्यात बोट उलटून 50 जण बुडाले.
हैदराबाद : आंध्र प्रदेशमधील पूर्व गोदावरी
जिल्ह्यात बोट उलटून 50 जण बुडाले. या
खासगी प्रवासी बोटीवर 61 प्रवाशी होते.
त्यापैकी 14 जणांना वाचविण्यात यश आले.
यात 13 जण मरण पावले असून बोटीवरील
10 कर्मचारी अद्याप बेपत्ता आहेत. मृतांच्या
निकटवर्तीयांना 10 लाख रूपये मदत राज्य
सरकारने जाहीर केली आहे.
घटनास्थळावर पूर्व आणि पश्चिम गोदावरी
जिल्ह्याचे अधिकारी, राज्य आणि राष्ट्रीय
आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरफ) पथके
आणि पोलिस घटनास्थळावर रवाना झाली
आहेत. या बोटीत जीवरक्षक जाकीट
घातलेल्या 14 जणांना हा अपघात पाहणाऱ्या
ग्रामस्थांनी वाचविले आहे.
सेनिक पर्पहिलला जाणसाठी ही बोट
कटचुलूक गावातून निघाली. त्यानंतर
तासाभरात ही दूर्घटना घडली. काही
ग्रामस्थांनी बोट बुडताना पाहिली. त्यांनी 14
जणांना वाचवून दोन मृतदेह काठावर आणले.
बचाव कार्यासाठी आंध्रप्रदेश पर्यटन
महामंडळाच्या दोन बोटी आणि एक
हेलीकॉप्टर तैनात करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या 15 दिवसांपासून नदी दुथडी
बरून वहात असताना काकीनाडा बंदर
अधिकाऱ्यांनी या बोटीला प्रवासी वाहतूक
करण्याची परवानगी दिलीच कशी? असा
सवाल करण्यात येत आहे. या अपघाताच्या
चौकशीचे आदेश पूर्व गोदावरीच्या
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री
वायएसआर जगमोहन रेड्डी यांनीही या
दूर्घटनेच्या चौकशीचे आदेश देऊन पर्यटनमंत्री
अवंती श्रीनिवास यांना घटनास्थळी रवाना
करून मदत कार्यावर देखरेख करण्याचे आदेश
दिले आहेत.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा