Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १६ सप्टेंबर, २०१९
गांधली पांझर तलाव 90 टक्के भरल्याने 10 ते 15 गावांना मिळणार जलशांती
आ.शिरीष चौधरींच्या प्रयत्नाने तलावाची दुरुस्ती झाल्याने साचले पाणी
अमळनेर प्रतिनिधी शिवाजी पारधी तालुक्यातील गांधली पांझर तलावाची काळाच्या ओघात प्रचंड दुरवस्था झाली असताना आ.शिरीष चौधरींनी लक्ष घालत 60 लाख निधीतुन हा तलाव पुनर्जीवित केल्याने यंदाच्या समाधानकारक पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचून हा तलाव तब्बल 90 टक्के भरला आहे, यामुळे गांधली सह परिसरातील 10 ते 15 गावात जलशांती निर्माण होऊन शेतकरी व ग्रामस्थांना सुगीचे दिवस येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
काही दिवसांपूर्वी आ.चौधरींनी या तलावाच्या दुरुस्तीसाठी 60 लाखांचा निधी मंजूर केल्यानंतर त्यांच्याच सूचनेनुसार पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम जोमाने करण्यात आले होते.अखेरप्रयत्नझ सफल ठरले आहेत, या तलावाची साठवण क्षमता 671. 54 दशलक्ष घनमीटर,तर सिंचन क्षमता 144.00 हेक्टर, आहे, तलावाची लांबी 2017 मीटर तर उंची 9 मीटर आहे. गांधली, पिळोदा, नगाव, कचरे, देवगाव-देवळी, धुपी, पिपळी, दहिवद गावांसह 10 ते 15 गावांना याचा फायदा होणार आहे.काळाच्या ओघात नादुरुस्त झालेल्या गांधली पाझर तलावाच्या दुरुस्तीकरिता जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्द करून घ्यावा अशी मागणी आ शिरीष चौधरी यांनी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री ना चंद्रकांत पाटील यांच्याकडे वेळोवेळी केली होती,अखेर यात त्यांना यश येऊन नियोजन समितीने या तलावाच्या दुरुस्तीसाठी 59.52लाख निधीस मंजुरी दिली होती.
दरम्यान अमळनेर मतदार संघात सर्वात मोठा असलेल्या या गांधली पिळोदा पाझर तलावाचे काम 1994,95 मध्ये करण्यात आले होते,बांधकाम दगडामध्ये करण्यात आले होते,परंतु काळाच्या ओघात बांधकामास मोठया प्रमाणात जाऊन पाझर तलावावर मोठया प्रमाणात झाडे झुडपे वाढलेले होते,तसेच भरावांचे मोठया प्रमाणावर संकोचन झाले होते,गाभा भराव व पायाभूत पाणी पांझरण्याचे प्रमाण देखील खूप वाढले होते.सांडवा व पक्ष भिंतींचे बांधकाम बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या अवस्थेत येऊन तलावाचा गाभा भराव साखळी अतिवृष्टीत वाहून गेल्याने पाणीसाठा शून्यटक्के झाला होता.अमळनेर तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे चार वर्षांपासून दुष्काळजन्य परिस्थिती असताना,हा तलाव शेतकर्याना खूपच फायदेशीर असल्याने तलावाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्द व्हावा अशी मागणी आ चौधरी यांनी केली होती,त्याअनुषंगाने हा निधी मंजूर होऊन तो पुनर्जीवित व जलमय देखील झाल्याने शेतकरी बांधवात समाधान व्यक्त होत असून आ.चौधरींचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा