Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९
प्रतिनिधी: शिंदखेडा तालुक्यातील जसाने गावासाठी ऐतिहासिक दिवस असून अनेक वर्षे तापी नदीला पूर आल्यानंतर या गावातील लोकांना भीतीने राहावे लागत होते या गावासाठी विरदेल रस्त्यावर नवीन गाव बसविण्यात येणार असून या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण डी , जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, प्रांत अधिकारी विक्रम बांदल, तहसीलदार सुदाम महाजन, साहेबराव सोनवणे, आदी मान्यवर उपस्थित होते
एखादया गावांचे पुर्नवसन म्हणजे त्या गावासाठी मोठा ऐतिहासिक दिवस असतो त्यासाठी गावाने देखील आपले गाव आदर्श बसावे याकरिता सहकार्य करणे गरजेचे असून जसाने गावातील त्याचे उत्कृष्ट असे प्लॅनिंग आम्ही केले आहे त्यात सरकारी इमारती, खुल्या जागा , अशी सर्व सोय करून गावाचा प्लॅन काढला आहे प्रत्येक प्लॉट हा 1500 चौरस फुटाचा असून एवढ्या जागेत अतिशय सुंदर असे घर बांधले जाणार आहे पण तरीही लोकांनी घरे बांधताना सरकारी जागेत बांधू नयेत अतिशय शिस्तीत घरे उभारली पाहिजेत, जे गावातील प्रमुख तीन रस्ते आहेत त्यांना आम्ही तात्काळ काँक्रीटीकरण साठी निधी देणार असून गावदरवाजासह इतर कामे देखील पुढच्या काळात मार्गी लावण्यात येतील.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
माधव खाबिया वणी : वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक...
-
वणी : महेंद्र लोढा पर्वाधिराज पर्युषण महापर्वाचा कसबे वणी येथील शंखेश्वर पार्श्वभ्युदय तीर्थक्षेत्री अत्यंत भक्तीमय आणि मंगलमय वातावरणात सम...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा