Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ११ सप्टेंबर, २०१९

कृषी संदर्भातील संस्था बळकट करणे काळाची गरज - श्रीराम पाटील





रावेर अजीज शेख:भारत हा कृषी प्रधान देश असल्याचे आपण नेहमी ऐकत आहोत परंतु शेती विषयक व्यवसाय आणि त्या संबंधित कार्य करणाऱ्या संस्था बळकट करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन श्रीराम फौंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील यांनी केले 

रावेर येथील सहकारी पीक संरक्षण मंडळ ली च्या वार्षिक बैठकीत अहवाल प्रकाशन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी श्रीराम फौंडेशन अध्यक्ष श्रीराम पाटील आणि भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, अंबिका व्यायाम शाळा संचालक भास्कर महाजन हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. याठिकाणी वार्षिक अहवालाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात चेअरमन दिलीप पाटील यांनी करतांना संस्थेच्या वार्षिक वाटचालीचा आढावा सादर केला. पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, पीक संरक्षण संस्था ही आपल्या शेतकऱ्यांच्याहिताची असून आपण सर्वांनी या संस्थेच्या प्रगतीसाठी आपला खारीचा वाटा उचलावा असेही आवाहन करून शासनाकडून कोणतीही मदद लागल्यास शासन दरबारी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी आणि सभासद यांनी श्रीराम पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले आणि भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. 

बैठकीस सांचालक ज्ञानेश्वर महाजन, देविदास महाजन, नामदेव महाजन, भास्कर महाजन, शैलेंद्र देशमुख, बाळू शिरतुरे, यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते 
बैठक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सेक्रेटरी पुरुषोत्तम चौधरी, ज्ञानेश्वर महाजन यांच्यासह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध