Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १ सप्टेंबर, २०१९
बहाळ येथे हारतालिके निमित्ये फारळचे वाटप , सार्वजनिक ठिकाणी महापूजेचे आयोजन
प्रतिंनिधी बहाळ संतोष भोई रथाचे येथील सारजा बारजा मंदिर ,सावता महाराज मगल कार्यालयात व कसबे बहाळ येथील राम मंदिर आज हारतालेकीची सार्वजनिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्ये येथील पंचायत समिती सभापती स्मितल बोरसे यांनी फराळचे वाटप केले .पूर्वकाळी पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे
असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. इतक्यावरच ती थांबली नाही तर आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून पळून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन शिवलिंगाची पूजा आरंभली.त्या दिवशी भाद्रपद मासातील तृतीया होती व हस्त नक्षत्र होते.पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या
विनंतीला मान देवून पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे शिव पुराणात मध्ये शिवजिला प्रसन्न
करण्यासाठी वाळूचे शिवलिंग बनवले होते .त्याचे पूजन करून शिवजी प्रसन्न केले तेव्हा पासून कुमारिका व लग्न झालेल्या महिला हे व्रत करतात. अशी माहिती येथील पूरोहित बाळू जोशी , विजय जोशी यांनी सागीतले . आशाबाई शिंपी यांच्या सकल्पनेतून ही फराळाचे वाटप करण्यात आले यावेळी सभापती स्मितल बोरसे , माधुरी शिंपी , वैशाली भोई ,सुनीता शिंपी , कल्पना मोरे , स्वाती शिंपी, लीलाबाई वाणी यांचासह अनेक महिलांनी उपशीत होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा