Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९
रावेर तालुक्यातील उर्दू शाळा रेन वाटर हार्वेस्टींग ने सज्ज
प्रतिनिधी अजीज रावेर:तालुक्यातील उर्दू शाळांनी दोन दिवसात रेन वाटर हार्वेस्टींग हा उपक्रम यशस्वीपणे राबवीला. याबाबतरावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मा. डा. सोनिया नाकाडे यांच्या आदेशानुसार दोन दिवसात रेन वाटर हार्वेस्टींग हा उपक्रम राबविणे बाबत सर्व शाळांना सुचना देण्यात आल्या होत्या हा उपक्रम यशस्वी करण्या साठी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे विभागीय सचिव गौस खान व संघटनेची मदत घेण्यात आली.
उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करून आपापल्या शाळान मध्य रेन हार्वेस्टींग करून ते सज्ज केल्या. व सदरील उपक्रम यशस्वी पणे पार पाडले. तालुक्यातील एकूण उर्दू माध्यमाच्या २१ शाळा असून त्यातील जि.प.उर्दू शाळा ऐनपुर, केह्राळे, खानापुर, खिर्डी, विवरे,रावेर कन्या,रावेर बाईज न.1 रसलपुर उर्दू कन्या व बाईज, या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी दोन दिवसात रेन वाटर हार्वेस्टींग पुर्ण करून फोटो सह अहवाल देउन उपक्रम यशस्वी केला असून उर्वरित शाळेत ही उपक्रम राबविला जात आहे.बद्दल गटविकास अधिकारी मा. डा. सोनिया नाकाडे यांनी अभिनंदन केले.
रावेर उर्दू केंद्र शाळेस मा. श्रीराम पाटील व ऐनपुर उर्दू शाळेस मा नईमुद्दीन शेख यांनी दत्तक घेऊन कार्य पुर्ण करण्यासाठी मदत केली. गट शिक्षणाधिकारी
मा. विजय पवार , मा.नईमुद्दीन शेख शिविअ,व मा. नवाज तडवी शिविअ, व प्रभारी केंद्र प्रमुख कमाल शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा