Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९
शिरपूर तालुक्यात निवडणूक पूर्व अस्वस्थता
राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले असून विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे तसेच निवडणूक आयोगाने आचारसंहिता देखील लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. शिरपूर तालुक्यात मात्र: निवडणूक पूर्व अस्वस्थता जाणवत आहे. या निवडणुकीत भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, युती झाली नाही तर शिवसेना, मानव एकता पार्टी, इतर क्षत्रिय पक्ष, व काही अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत. त्यातील आजवरची प्रमुख लढाई ती नेहमीच भाजप आणि काँग्रेस यांच्यात राहिली आहे. आजवर काँग्रेसचा गड असलेल्या शिरपूर तालुक्यावर मागील काही काळापासून भाजपाने आक्रमण करत आपले मताधिक्य वाढवले आहे.2014 च्या आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिरपूर तालुक्याने भाजपात प्रथम पसंती दिली आहे. त्यामुळे या विधानसभेत देखील जनतेचा कौल भाजपच्या दिशेने राहिल्यास विधानसभेच्या गड भाजप लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाकडून डॉक्टर जितेंद्र ठाकूर हे एकमेव उमेदवार निवडणूक लढण्यास सज्ज असून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र तालुक्यात सुरू असलेल्या पक्षांतर बाबत च्या चर्चेने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाचे आमदार काशीराम पावरा ना. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात होत्या. मात्र यांच्या प्रवेश लांबणीवर पडल्याने यांच्या प्रवेशाची लांडगा आला रे या कथानकाचा प्रमाणे गत झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अनेक वेळा यांच्या भाजपा प्रवेशाचे संकेत दिले गेले आणी तारखा देखील दिला गेला. मात्र ज्यांना प्रवेश करायचे आहे त्यांनी कमालीची गुप्तता ठेवले. याबाबत गुप्तता ठेवून त्यांनी सस्पेन्स वाढवला. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडील भाजपात प्रवेश करण्याच्या आहे असे संकेत त्यांनी दिले. कालच्या अमित शहा यांच्या दौऱ्यात त्यांच्या प्रवेश मानला जात होता तो देखील झाला नाही. दरम्यान नामदार भाईंनी या सर्व अफवा असून कोणताही अंतिम निर्णय झाला नाही वृत्तपत्रातून घोषित केले. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मात्र कमालीच्या गोंधळात आहेत. कार्यकर्त्यांची मानसिकता भाजपात विलीन होण्याचे असून वरिष्ठांनी मात्र याबाबत निर्णय न जाहीर केल्यामुळे त्यांची संभ्रमावस्था वाढली आहे. धरल तर चावतय सोडल तर पळतय अशी त्यांची अवस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात कमालीची शांतता असून निवडणुकपूर्व अस्वस्थता दिसून येत आहे. निवडणुकीच्या दृष्टीने सुरु होणारे कोणतीही पूर्वतयारी काँग्रेसकडून दिसून येत नाही. एकीकडे काँग्रेस पक्षाने आमदारकीचे तिकीट काशीराम पावरा यांना जाहीर केले आहे. तर दुसरीकडे त्यांच्यात भाजप प्रवेशाची चर्चादेखील जोरात आहेत. त्यामुळे कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत.
दुसरीकडे भाजपच्या गोटातून डॉक्टर ठाकूर यांनी प्रचारात आघाडी घेतली असून त्यांनी आपला जनसंपर्क वाढवला आहे. पक्ष कार्यालयावर जनतेची रीघ लागली आहे. हालचालींना सुरुवात झाली आहे. कार्यकर्ता देखील जोमाने कामाला लागला आहे, प्रतिसाद देखील उस्फूर्तपणे मिळत आहे त्यांना भाजपची उमेदवारी मिळेल अशी आशा कायम असताना तालुक्यातील पक्षांतर च्या चर्चेने भाजपच्या गोटात देखील अस्वस्थता आहे. संभावित नेत्यांचे पक्षांतर झाल्यास तालुक्याची पुढील दशा आणि दिशा काय असेल याबाबत विचारविनिमय होत आहे. पक्ष आपल्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देईल की नवीन आलेल्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ देईल याबाबत मते मतांतर असल्याने राजकीय अस्वस्थता वाढीस लागले आहे. सध्या पितृपक्षाचा अडचण असल्याने भाजपच्या मेगा भरती ला ब्रेक लागला असून घटस्थापनेच्या मुहूर्तावर मुहूर्तावर अनेक मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी घडामोडींवर अनेकांचे लक्ष लागले असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत भाजपचा गड जिंकण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सज्ज असून ते जोमाने कामास लागले आहे. संवाद यात्रे पासून डॉक्टर ठाकूर जोमाने कामाला लागले असून जनतादेखील उस्फूर्त प्रतिसाद देत आहे. काही दिवसांपासून विधानसभेचे राजकारण तापले असून डॉक्टर ठाकूरांना विरोध म्हणून काही आदिवासी संघटनांनी खरा आदिवासी आणि बोगस आदिवासी हा नवा मुद्दा उपस्थित करत निवडणुकीला जातीय रंग देण्याच्या प्रयत्न केला आहे. मात्र यास आदिवासी समाजाकडूनच प्रखर विरोध होत असून राजकारण करू नये असा कोणताही भेदभाव करू नये असे आवाहन केले जात असून कोणीही राजकारण्याच्या अफवांच्या बळी पडू नये आदिवासी समाज' पूर्णपणे डॉक्टर ठाकूर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे मत याचे समाजातील जाणकारांनी मानले आहे.
राजकारण आले जात पात हा मुद्दा प्रामुख्याने चर्चेला येत असतो. मात्र आता यापलीकडे जाऊन तालुक्याचे जनतेने विचार करण्याची गरज आहे. उमेदवार कसा असावा याचे भान जनतेनी ठेवणे गरजेचे आहे. आपला उमेदवार उच्चशिक्षित असावा. जनतेच्या प्रश्नांची जाण घेणारा असावा. अर्ध्या रात्री मदत करणारा असावा. विकासाचा ध्यास असणारा असावा. जनतेच्या प्रश्नांची समज असणारा असावा. सोडवण्याची धडपड त्यात असावी. नवीन नवीन विकासाच्या कल्पना आणि ध्यास ते चांगले असावा, असा उमेदवार जो सर्वांना घेऊन चालेल, कोणताही जातीभेद म्हणणार नाही, गोर गरीब श्रीमंत असा भेदभाव करणार नाही, आणि सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होईल अशा पद्धतीने काम करू शकेल असा उमेदवार तालुक्यात मिळावा ही सामान्य जनतेची अपेक्षा असते. आणि ह्या अपेक्षा मध्ये कोठेही जात-पात हा संदर्भ यायला नको. आता या पलीकडे विचार करून सक्षम उमेदवाराची निवड करून जनता आपला आमदार निवडले यात साशंकता नाही. त्यामुळे पुढील चित्र लवकरच स्पष्ट होणार असून विधानसभेचे रणांगण सुरू होणार आहे. मात्र वारंवार होणाऱ्या पक्षांतराच्या चर्चा यामुळे सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमात आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा