Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९

टेकवाडे येथे रसिकलालजी पटेल उर्फ पप्पाजी यांच्या स्मृतिदिनानिम्मित व्याख्यान




कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे 
टेकवाडे येथील आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात संस्थेचे आधारस्तंभ स्व. रसिकलाल पटेल उर्फ पप्पाजी यांचा स्मृतिदिनामित्त विदयालयाचे प्राचार्य सिद्धार्थ पवार यांचे व्याख्यान संपन्न झाले. सुरुवातीला रसिकलालजी पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य बापू पारधी , टेकवाडे येथील सरपंच संजय भाऊ धनगर , टेंभे गावातील सामाजिक कार्यकर्ते देवेसिंग राजपूत, माजी उपसरपंच सदाशिव वाडीले,पत्रकार रामसिंग राजपूत , खामखेडे गावाचे शांतीलाल भलकार, दिलीप वानखेडे ,दाजभाऊ राजपूत , प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री. बी. आर. महाजन, पर्यवेक्षक बी. एस. जमादार गावातील नागरिक , सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.  या दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  विद्यालयातील उपशिक्षक श्री. ए. जे. पाटील यांनी केले. त्यात त्यांनी पप्पाजी यांच्या कार्याची ओळख करवून दिली.         
 या कार्यक्रमाचे व्याख्याते प्राचार्य श्री सिद्धार्थ पवार यांनी आपल्या विचारांतून पप्पाजी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून प्रेरणादायी उदाहरणे देवून विद्यार्थ्यांना प्रबोधन केले. पप्पाजी यांच्या विचारांची गरज आजच्या समाजाला कशी आहे? याचे विवेचन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.  त्यांनी आपले विचार मांडतांना पप्पाजी यांचे योगदान तसेच त्यांची समाजासाठीची तळमळ आपल्या विचारातून स्पष्ट केली. यावेळी विद्यालयातील गरीब विद्यार्थी राजपूत दिनेश रणजितसिंग यांस शालेय गणवेश तसेच बाशिंगे दादासाहेब संजय या विद्यार्थ्यास बूटमोजे दिले .  
    
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.आर.जाधव यांनी केले. तर आभार श्री. जे. व्ही. पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचा-यांनी प्रयत्न केलेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध