
SEPTEMBAR 24, 2019
- पारदर्शक कारभाराच्या आव आणून भ्रष्टाचार व गैरकारभार करणाऱ्या रेशन दुकानदाराना स्थगिती आदेश देणाऱ्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना औरंगाबाद उच्च न्यायालयाची चपराक .
मा.राज्य मंत्री अन्न व नागरी पुरवठा विभाग यांचा पारदर्शक कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे .तहसिलदार ,जिल्हापुरवठा अधिकारी व उपायुक्त यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रेशन दुकानदार यांना रेशन दुकानाचा परवाना परत देत सत्ताधारी पार्टी किती पारदर्शक कारभार करते याची जाणीव तक्रारदार दगाजी पाटील यांना राज्य मंत्री यांनी करून दिली .
ढेकू खु.येथील व तालुक्यात आता पर्यंत आठ रेशन दुकानांचा परवाना ज्यांच्या मुळे रद्द झाले आहेत अश्या पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी पारधी व दगाजी पाटील यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली . औरंगाबाद खंडपिठ यांच्या आदेशाने ढेकू येथील रेशन दुकानाचा परवाना रद्द करत ढेकू खु.येथील रेशन दुकानदार सुनिल वाणी यांना जोडण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा