Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

सावदा येथे खान्देश नारीशक्ती तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप



 
प्रतिनिधी अजीज शेख रावेर: तालुक्यातील  सावदा-येथील  नगरपरिषद संचलित श्री.नानासाहेब विष्णु हरी पाटील विद्यामंदिर येथे खान्देश नारीशक्ती गृप तर्फे कन्यादिप उपक्रमांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त नववी व दहावीच्या विद्यार्थीनींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींना वह्यांचे वाटप आणि इयत्ता दहावीच्या विद्यार्थीनींना सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश नारीशक्ती अध्यक्षा सौ.दिपाली चौधरी झोपे होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला व मुलींसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून विविध योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्यासाठी मोदीजी प्रयत्नशील असल्याचे यावेळी सौ.दिपाली चौधरी यांनी सांगितले.याप्रसंगी सौ.दिपाली चौधरी झोपे यांच्यासह श्री.देवेंद्र झोपे सर,खान्देश फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.संदिपभाऊ पाटील, शाळेतील शिक्षक शिक्षिका सर्वश्री सौ.पुष्पलता प्रविण ठोंबरे,सौ.चारुलता सतीश चौधरी,सौ.राधाराणी प्रविण टोके,सौ.निर्मला रेवानंद बेंडाळे,श्री.प्रकाश भालेराव,श्री.राजेश नारायण जावळे,श्री.निलेश चौधरी,श्री.जी बी तडवी,श्री.एस एम भोई यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.


(२५ कोटींच्या कामात पाणी का अडले) नाही?
माजी आ.शिरीष चौधरी यांचा सवाल,
रावेर तालुक्यातील
निंभोरा येथे बूथ मेळाव्यात शिरीष चौधरी (आक्रमक .)




प्रतिनिधी अजीज शेख: निंभोरा खोटी व दिशाभूल करणारी वक्तव्ये आणि आणि फसव्या जाहिरातबाजीला आताचा तरुण थारा देणार नसून त्याची नोकरी हिसकावनाऱ्या भाजपच्या सत्ताधाऱ्यांना घरी बसविण्यासाठी  आताच तरुण आतुर झाला असून   बेरोजगार तरुणांनी या सरकारला धडा शिकविण्याचा चंग बांधला असल्याचा आक्रमक निर्वाळा निंभोरा येथील  युवा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केला.

निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालयातील युआव कार्यकर्ते व बूथ मेळाव्यातील मार्गदर्शनात माजी आ.शिरीष चौधरी आक्रमक पद्धतीने बोलत होते.यायला त्यांनी बोलतांना विद्यमान आ.हरिभाऊ जावळे यांचा व सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला.यावेळी त्यांच्या सोंबत व्यासपीठावर यावल चे प स सदस्य शेखर पाटील,मसाका माजी संचालक चत्रभुज खाचणे,खिरोद्याचे धनंजय चौधरी, कृषि विद्यालयाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद बोंडे,सुनील कोंडे,कडू भंगाळे,इकबाल शेख,उपस्थित होते तर कार्यक्रमास विकास सोयासायटीचे चेअरमन मोहन बोंडे,व्हा.चेअरमन दत्तात्रय पवार,काशीनाथ शेलोडे,सुरेंद्र सोनवणे,सुधाकर भंगाळे,गुणवंत भंगाळे, गिरीश नेहेते,सुधीर मोरे,रवींद्र भोगे, बाळासाहेब पवार,किशोर चौधरी,किशोर पवार,नितीन भंगाळे,हिरामण बोंडे,प्रमोद भोगे, अनिल सोनवणे,वाल्मिकराव पवार,योगेश कोलंबे,प्रकाश खाचणे,संदीप खाचणे, रामराज्य संघाचे धीरज भंगाळे,जयेश चौधरी,ज्ञानेश्वर भंगाळे यांसह मोठ्या प्रमाणावर तरुण व युवा कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.या वेळी बूथ संरचनेविषयी श्री.योगेश तळेले यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.यानंतर चत्रभुज खाचणे,प स सदस्य शेखर पाटील,प्रल्हाद बोंडे आदींनी मनोगते व्यक्त केली.तर माजी आ.शिरीष चौधरी यांनी स्व.माजी मंत्री मधूकरराव चौधरी यांनी केलेल्या कार्याबद्दल व सिंचन व शिक्षण यांच्यावर केलेल्या कार्याबद्दल सविस्तर विवेचन केले.तर जलसंधारणाच्या कामाबद्दल बोलतांना माजी आ.शिरीष चौधरी यांनी गेल्या ४ वर्षात किमान २४ कोटींपर्यंत जलसंधारणाचे काम झाले असतांना पाणी कुठे अडले??अशी विचारणा करीत संत महंतांच्या सहकार्याने ५०लाखांत १०लाख लिटर पाणी मुरल्याचे सांगत संत महंतांच्या यशाचे श्रेय लाटण्याचे काम आ.जावळे करीत असल्याचा आरोप केला.तसेच फ्लड कॅनल ही माजी मंत्री मधुकरराव चौधरी यांनी १९९१ ची संकल्पना असतांना त्याव्हे ही फुकट श्रेय लुटण्याचे काम सत्ताधारी करीत असल्याचे माजी आ.शिरीष चौधरी यांनी सांगितले.सद्यस्थितीत कित्येक तरुण शहरातून आपल्या घरी येत असून त्यांची नोकरी गेल्याने त्यांच्या कुटुंबावर गंभीर समस्या निर्माण झाली आहे.अशा  मुद्यांना गांभीर्याने घेण्याऐवजी सत्ताधारी देशभक्तीच्या नावाने तरुणांना फसवीत असल्याचे सांगत शेळगाव बॅरेजसाठी ७००कोटी आणणार असल्याचे सांगणारे किती पैसे आले याचा हिशोब देत नसल्याचे सांगितले.रावेर यावल तालुक्यातील धरणांमुळे हा परीसर कॅलीफोर्निया करण्यासाठी स्व.माजीमंत्री मधुकरराव चौधरी उणनी आदिवासी व सर्व समाजाला सोबत घेऊन कार्य केल्याचे सांगितले.


(बूथ कमिटया निवडणुकीचा आत्मा)
(विवेक ठाकरे)



प्रतिनिधी अजीज शेख:निंभोरा,ता.रावेर-एमआयएम व वंचित आघाडी  पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरणार असून निवडणूक सोपी करण्याच्या उद्देशाने बूथ कमिटया म्हणजे निवडणुकीचा आत्मा असल्याने बूथ समन्वयकांनी तळमळीने काम करावे असे आवाहन जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी केले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
एमआयएम-वंचीत आघाडीच्या वतीने जिल्हा परिषद गट निहाय बूथ कमिटया तयार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत असून
आज बुधवार,१८ सप्टेंबर रोजी
चिनावल-खिरोदा,विवरा-वाघोड आणि निंभोरा-तांदलवाडी गटाच्या बूथ समन्वयांची बैठक येथे घेण्यात आली.एमआयएम कार्यकर्त्यांच्या बैठकीला श्री.ठाकरे यांनी मार्गदर्शन केले.

रावेरची जागा एमआयएमला सुटावी-
वंचितचे नेते अँड बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर ओवेसी यांच्यात पुन्हा आघाडी होण्याच्या दृष्टीने बोलणे सुरू झाल्याने कार्यकर्त्यांना आनंद झाल्याचे दिसून आले. एमआयएम व वंचीतची आघाडी झालीच पाहिजे अशी भावना बैठकीत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.



यांची होती उपस्थिती-
वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव महेश तायडे,रावेर तालुकाध्यक्ष मनोहर कोळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख चंद्रकांत गाढे,यावल येथील धोबी समाजाचे संतोष वाघ,शकील खाटीक,विजय गाढे सर,राहुल गाढे,धनराज वाघोदे, सिद्धार्थ मोरे,सतिष गाढे,कुंदन गाढे,अमोल लहासे यांच्यासह एमआयएमचे नजीर शेख बशीर,उमर शेख फारुख, अलतमश शेख रईस,अनिस शेख कय्युम,नय्युम बेग अय्युब, अझहर रईस खान,साजिद शाह,शेख शकील,शोएब युनूस खान,अनिस शेख हमीद आदींची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध