Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

अडावदच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मंत्री राम शिंदेंचा दिलासा...... पिपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी सह कृउबा चे सभापती जगन्नाथ पाटीलच्या प्रयत्नना यश





चोपडा प्रतिनिधी विनोद निकम तालुक्यातील अडावद येथील 211 कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कांदाचे अनुदान मिळाले नव्हते  मागील चार महिन्यापासून शासनाकडे अडकले आहे अडकलेले अनुदान मिळण्यासाठी पणन मंत्री राम शिंदे यांना चोपडा पिपल्स बँकचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी सह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ दामू पाटील यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांची व्यथा सांगितली तर मंत्री राम शिंदे यांनी दिलासा देत मी नक्कीच शेतकऱ्यांचा हिताचा विचार करू असे आश्वासन दिले आहे 

सविस्तर असे की, तालुक्यातील अड़ावद येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांदा ज्या व्यापाऱ्याला विक्री केला होता तो व्यापारी शेतकऱ्यांना चकमा देऊन पोबारा झाला आहे  शेतकऱ्यांचे त्या व्यापाऱ्यांकडे अडकलेले पैसे बुडीत झाले आणि कांदा उत्पादकाना शासानाकडून प्रति किंटल 200 रुपये अनुदान जाहीर झाले होते मात्र हे अनुदान मिळण्यासाठी कांदयाची विक्री,सौदा,आणि हिशोब पावती अश्या पावत्या अनुदान प्राप्तीसाठी आवश्यक आहे. परंतु व्यापारीच फरार झाल्याने ह्या पावत्या कांदा उत्पादकाकडे नसल्याने शासनाचे अनुदान रखडले होते मागील चार महिन्यापासून 211 कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत शेतकऱ्यांची व्यथा पाहून चोपडा पिपल्स बँकचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगन्नाथ दामू पाटील यांनी दि 18 रोजी  महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री राम शिंदे  याच्या निवास स्थानी मु.चौण्डी ता. जामखेड जि. अहमदनगर येथे भेट घेतली या भेटी प्रसंगी चंद्रहासभाई गुजराथी, आणि जगन्नाथ पाटील यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडली आणि मंत्रीमहोदयना विनंती करून सांगितले की, त्यांचे कांद्याचे पैसेही बुडाले आहे आणि अनुदान ही मिळत नाही तर शेतकऱ्यांकडे कोणताही पर्याय राहिला नाही ती संपूर्ण व्यथा ऐकून पणन मंत्री राम शिंदें यांनी शब्द दिला की, मी शेतकऱ्यांचा पाठीशी आहे लवकरच अनुदान प्राप्त करून देऊ असे आश्वासन दिले यासाठी माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार हरीभाऊ जावळे यांनीही प्रयत्न केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध