Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

एकलहरे येथील ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुटले



पंकज पाटील (उपसंपादक तरुण गर्जना)
 
  • एकलहरे येथील तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश होण्याकामी उप-मुख्यकार्यकारी  अधिकारी  यांच्याकडे मागणी .
  • प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष पंकज पाटील यांच्याकडे न्याय मिळण्यासाठी उपोषण कर्त्यांनी लेखी पत्र देवून घातले साखळे.
 
एकलहरे येथील ग्रामस्थांचे पंचायत समिती समोर साखळी उपोषण सुरु होते. गांवी  नमुना नं.८ ला बेकायदेशीर हेरफार व दफ्तरात खाडाखोड केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर  शासन निर्णयानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी ज्ञानेश्वर पाटील यांनी  केली होती .पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केलेली असल्याने  जिल्हाधिकारी यांनी उप-मुख्यकार्यकारी  अधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले होते.
 
गटविकास अधिकारी अमळनेर यांनी उपमुख्यकार्यकारी यांच्याकडे सादर केलेल्या अहवालात सरपंच सौ.मिनाबाई पाटील, भास्कर पाटील, यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९(१) नुसार व ग्रामसेवक विजय देसले,चतुर देवरे  व गणेश पाटील यांचेविरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद ,जिल्हा सेवा (शिस्त व अपील ) १९६४ नुसार कार्यवाही करण्यात यावी यासाठी अहवाल पाठवला होता .अहवाल पाठवल्यानंतर देखिल राजकीय दबावापोटी संबधितांवर गुन्हा दाखल होत नसल्याने पाटील साखळी उपोषणाला बसले होते .
 
प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष पंकज पाटील  यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिल्यानंतर त्यांची समस्या जाणून घेतली.उपोषण कर्त्यांनी न्याय मिळावा म्हणून त्यांना लेखी निवदेन दिल्यानंतर पंकज पाटील यांनी मध्यस्थीची भुमिका घेत उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडून यापुढील पाठपुरावा मी स्वतः करेल असे आश्वासन दिले.
 


यानिमित्ताने गटविकास अधिकारी वायाळ यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता दिलेला अहवाल व गुन्हा दाखल करण्याची केलेली मागणी हे एवढेच दाखवते की, कायद्यापेक्षा  कुणीही मोठ नसत . निमझरी येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर दाखल झालेले गुन्हे व आता एकलहरे येथील तत्कालीन दोन सरपंच व तीन ग्रामसेवक दोषी आढळल्याचा अहवाल देवून गुन्हा दाखल करण्याची केलेल्या मागणीमुळे  त्यांच्या  पारदर्शक कारभारामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

याप्रसंगी विस्तार अधिकारी राणे साहेब ,चिंचोले नाना व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध