Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

आघाडी पाठोपाठ आता भाजपचा शिवसेनेला धक्का, कोकणातील नेता करणार भाजपमध्ये प्रवेश ?





मुंबई:प्रतिनिधी:विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यां नेत्यांची संख्या वाढत आहे. मेगाभरती १ व २ नंतर पुढील काही दिवसांत विरोधी पक्षातील आणखीन काही नेते प्रवेश करणार असल्याचं बोलले जात आहे. यामध्येच आता कॉंग्रेस, राष्ट्रवादी पाठोपाठ भाजप शिवसेना नेत्याला गळाला लावताना दिसत आहे. कोकणातील शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने चर्चेला उधान आले आहे.
सुर्यकांत दळवी यांचा दापोली मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी दळवी यांनी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यावर कडाडून टीका केली होती. रामदास कदम हे भगत आणि जादूटोणावाले आहेत. ते दर अमावस्येला भगतगिरी करत असतात. ते बंगाली बाबांना घेऊन फिरतात. त्यांनी विरोधीपक्ष नेता बनण्यासाठी आमच्यासोबत भगत पाठवला होता, असा गंभीर आरोप दळवी यांनी केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रे रत्नागिरी येथे आली असता दळवी यांनी आपल्या समर्थकांसह त्यांची भेट घेतली. यावेळी आपल्यावर होणारा अन्याय मुख्यमंत्र्यांना सांगितला आहे. त्यांनी लवकरच चर्चा करत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असं दळवी यांनी सागितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध