Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

शहादा शिरपूर मार्गावरील कोठली गावाच्या दरम्यान MH.18.BA.0335 ह्या मालवाहू ट्रकच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठे नुकसान





प्रतिनिधी बाबू मण्यार:शहादा शिरपूर मार्गावरील कोठली गावाच्या  दरम्यान MH.18.BA.0335 ह्या मालवाहू ट्रकच्या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठे नुकसान होऊन ट्रक पलटी झाला आहे. या रस्त्यावर अपघाताची मालिका रोजच्या रोज सुरूच असते.या रस्त्यावर होणाऱ्या अपघातामुळे अनेक निष्पाप लोकांची प्राणज्योत मावळली गेले आहे.तर काहींना कायमचे अपंगत्वाला सामोरे जावे लागेल आहे. मात्र याला जबाबदार कोण? असा सवाल अनेक वेळा नागरीकांडुन केला जात असतो. अनेकदा संबंधित विभागाला जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होण्यापर्यंत वेळ आली आहे.
तरी देखील डागडुजी या महामार्गावर झालेली नसल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.सध्या विधानसभा 

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या रस्त्यांच्या विषय नेहमी गाजविला जात असून रस्ता दुरुस्तीबद्दलची जाणिव होत नाही.नेहमी संबंधित विभागाकडून नागरीकांंना रस्त्याबद्दलच्या तक्रारींना केराची टोपली दाखवली जात आहे. या विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर संबंधित लोकप्रतिनिधींना रस्त्याबद्दलचा

 तक्रारींबाबत फटका बसण्याची संकेत नागरिकांकडून वर्तविले जात आहे.रस्ता दुरुस्तीसाठी शासनाकडून निधी मिळतो की नाही.याचीही विचारपूस करण्यासाठी तसदी कोणी घेत नाही.यात लोकप्रतिनिधीनी देखील याकडे दुर्लक्ष केले असल्याचे समजते.रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळतो.मग रस्ताची डागडुजी का होत नाही.रस्ता दुरुस्तीसाठी आलेला निधी कोणाच्या घशात जातो अशी चर्चा सध्या नागरिकांंमध्ये जोर धरून आहे. शासनाकडून रस्ता दुरुस्तीसाठी निधीच मिळत नाही का ? या प्रश्‍नाचे देखिल उत्तर नागरिकांना भेडसावत असल्याचे समजते. सदरचा रस्त्यावरून नेहमी निवडून आलेले लोकप्रतिनिधी सह शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी रोज ये-जा करत असतात. तरी देखील रस्त्याबाबत दुरुस्तीसाठी संबंधित विभागाला जाब विचारण्यास कोणी तयार होत नाही.त्यामुळे रस्त्यावर खड्डे कि खड्ड्यात रस्ता असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.या मार्गावरील धावणार्‍या गाड्यांची संख्या देखील जास्त असल्याने खड्ड्यांचे स्वरूप दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.वाहनांची वाढती संख्या त्यातच या खड्ड्यांकडे झालेले दुर्लक्ष यामुळे खड्ड्यांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.शहादा पासून ते कुकावल,कोठली, वडाळी,बामखेडा, तोरखेडा,हिगणी थेेट शिरपुर पर्यंत रस्त्यावर जोगो जागी खड्डेच खड्डे पडलेल्याने शहादा ते शिरपूर या रस्त्याचे गणना एका वेगळ्या स्वरूपात होऊ लागली आहे.शहादा - शिरपूर रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून    नागरिकांच्या या रस्त्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन बदलू लागला आहे.याची जाणीव संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला होत नाही.त्यामुळे सदर रस्त्यावरून वाहनचालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित खड्डे बुजवून हा रस्ता वाहनधारकांसाठी सुरक्षित करावा अशी मागणी वेळोवेळी केली जात असते. पंतप्रधानांनी अच्छे दिनाची घोषणा सर्वांना दिली असून ती संध्या  रस्त्यापासूनच झाली सुरूवात बुरे दिनाची असा टोला दिला जात असल्याची चर्चा संध्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरीकांमध्ये रंगु लागली आहे.शहादा ते शिरपुर रस्त्यावरील अनेक गावांजवळ मोठ मोठे खड्डे पडले असून खड्डे टाळण्याचा नांदात नेहमी लहान मोठे अपघात घडत आहेत.खड्डे बुजविण्याचे काम अद्यापही झाले नसल्याने या मार्गावर खड्डे मुक्त रस्त्यांचे "अच्छे दिन" केव्हा येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.महाराष्ट्र शासनाच्या वतीने खड्डे मुक्त रस्ते हे अभियान चालविण्यात आले का नाही.याची मात्र अध्यापही कोणालाच काही माहिती नसल्याचे समजते आहे.सदर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम नेहमी थातुरमातुर पद्धतीने केले जाते.तसेच या रस्त्यावर महिन्याभरातच खड्डे "जैसे थे " होत असतात.विधानसभा निवडणूक जवळ येत असून रस्त्याबाबतच्या समस्या निराकरण शासनासह निवडून आलेल्या 

लोकप्रतिनिधींकडून होईल का ? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत असून  रस्ता लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची  मागणी जोर धरून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध