Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९

निंभोरा सेंट्रल बँकेत आठ दिवस ही लिंक बंदच, कोट्यवधींचे व्यवहार असताना लिंकमुळे ग्राहक हैराण.





निंभोरा प्रतिनिधी अजीज शेख 
येथील सेंट्रल बँकेत आधीच कमी कर्मचाऱ्यांवर काम चालवत असतांना गेल्या 3 महिन्यात अनेकदा लिंक बंद असल्यामुळे बँक ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. किमान ७०ते ८०कोटींवर व्यवहार असलेल्या या जिल्ह्यातील भक्कम आर्थिक व्यवहार असलेल्या बँकेत बीएसएनएल च्या लिंक वर अवलंबून राहावे लागत असून बीएसेनेलची वारंवार नेट कनेक्टिव्हिटी बंद पडणे ग्राहकांना मनस्ताप देणारी ठरत आहे.गेल्या 3 महिन्यात असे प्रकार वाढत असल्याने या बँकेत नेट व विजव्यवस्था बदलण्याची गरज आहे.अशीच परिस्थिती काल दि.१६रोजी दुपारी रोकड नसल्याने थांबलेल्या ग्राहकांना अनुभवायला मिळाली. 

बँकेतील यूपीएस द्वारे काम सुरू असताना यूपीएस बंद पडले.मात्र विजव्यवस्था सुरळीत झाल्यावर लेजर बंद पडले.व त्यामुळे व्यवहार होऊ शकले नाही.दुसऱ्या दिवशी दिवसभर नेट बंद असल्याने लिंक बंदमुळे वयवहार ठप्प राहिले मात्र खेड्यापाड्यातून येणाऱ्या व म्हाताऱ्या ग्राहकांना होणाऱ्या त्रासास जबाबदार कोण?? बीएसएनएल,वीजमंडळ,बँक प्रशासन या त्रिकुटातील त्रुटींमुळे मात्र ग्राहक भरडला जात असताना बँक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.वारंवार नेटची समस्या येत असताना कोट्यवधींचे व्यवहार होणारी सेंट्रल बँक साधे खाजगी कंपनीचे नेट कनेक्शन का ठेवू शकत नाही??असा प्रश्न ग्राहकांना पडला असून एक-दोन कर्मचाऱ्यांवर मोठे कार्यक्षेत्र असलेल्या बँकेने ग्राहकांना वेठीस धरले आहे. त्यामुळे कृषी कर्ज व कार्याची मोठी अडचण या शाखेत येत आहे.यामुळेच या बँकेत एखाद्या दिवशी ग्राहकांचा उद्रेक होईल अशी चिन्हे आहेत. आज सोमवार ही सकाळी लिंक बंद आहे असे समजल्यावर ग्राहकांनी संताप व्यक्त केला व बि एस एन एल आफिस मध्ये मोर्चा वळवला  असता भुसावळ कदम यांच्या सोबत बोलुन सेंट्रल बँकेचे रिजनल  मेनेजर  यांच्या सोबत 
चर्चा करुन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे

बैकतील लिंक सुरू असण्यासाठी लागणारी मोडम हे विजेच्या कमी जास्त होल्ट ने त्या मध्ये बिघाड झाल्याने नविन मशिन मागविले आहे असे टायमैक्स कंपनी चे पवार यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध