प्रतिनिधी : धरणगाव शहरात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अमलबजावणी सुरू असताना शहरात स्वच्छतेबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच धरणगाव नगरपरिषद शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवित आहे.
त्या अंतर्गत आज प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये विविध दुकानदार, व्यापारी,विक्रेते यांचेकडून जवळपास ३० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.तसेच बंदी असलेले प्लॅस्टिकचा साठा असल्यास संबंधितांनी सदर प्लास्टिक नगरपरिषदेच्या प्लास्टिक संकलन केंद्रामध्ये त्वरित जमा करावे अन्यथा प्लास्टिकचा साठा किंवा वापर करताना आढळल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नागरिकांची नोंद घ्यावी असे आवाहन नगरपरिषद मार्फत करण्यात आले. तसेच मुख्याधिकारी यांच्या कक्षात व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीमध्ये प्लास्टिक बंदी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली तसेच सदर मोहीम दररोज राबविण्यात येणारा असून व्यापाऱ्यांनी तसेच दुकानदारांनी सुध्दा न.पा. प्रशासनास सहकार्य करावे असे अशी अपेक्षा मुख्याधिकारी यांनी व्यक्त केली. सदर मोहीम मुख्याधिकारी श्री.जनार्दन पवार यांचे मार्गदर्शनाखाली तसेच आरोग्य निरीक्षक श्री रवींद्र गांगुर्डे यांचे टीम ने राबविली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा