Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१९
पंचायत समिती शहादा येथे कर्मचारी युनियन च्या वतीने एक दिवसाचा लाक्षणिक संप
शाहदा प्रतिनिधी:नितीन सावळे:महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने आज दि9सप्टेंबर2019 रोजी एक दिवसीय लाक्ष्यनिक संप पुकारण्यात आला होता. असे निवेदन गटविकास अधिकारी शहादा यांना देऊन संपास सुरुवात केली .त्या संपास महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी च्या वतीने सक्रिय सहभाग नोंदवत पाठिंबा देण्यात आला यातील प्रमुख मागण्या
(1)दि1नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी(2)सर्व
संवर्गातील सातव्या वेतन आयोगातील कृपया दूर कराव्यात,(3 )राज्यातील सर्व संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरावीत,(4)खाजगीकरण कंत्राटीकरण धोरण रद्द करून कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे,(5)केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना निमशासकीय कर्मचार्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते लागू करावे,(6)अनुकंपा तत्त्वावरील विनाअटीने भरती तात्काळ करावी(7)अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा वाढविण्यात यावी,(8)शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यात येऊ नये या प्रमुख आठ मागण्या घेऊन आज एक दिवसीय लाक्षणिक संप पंचायत समिती येथे पुकारण्यात आला होता या संपात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन अध्यक्ष विनोद ठाकरे ,सचिव वीरेंद्र अहिरे बेलदार नाना ,मन्साराम भाऊ ,सिसोदिया नाना ,खान नाना ,सहभाग नोंदवून यांची निवेदन देतांना प्रमुख उपस्थिती होती
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा