Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

मुंग, उडीद व सोयाबीनची खरेदी नाफेड अंतर्गत खरेदी करा काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी दयारामभाऊ वानखडे यांची मागणी




शेगाव :प्रतिनिधी उमेश राजगुरे:राज्यात पीक परिस्थिती चांगली असली तरी शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नसल्याने आर्थिक दृष्ट्या नुकसान होत आहे नाफेडचे केंद्र बंद असल्याने बाजारात कमी भावात माल विकावा लागत आहे त्यामुळे सर्व तालुक्याच्या ठिकाणी नाफेडचे केंद्र लवकरात लवकर सुरू करून मुंग, उडीद व सोयाबीनची खरेदी करन्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी दयारामभाऊ वानखडे यांनी केली आहे.

नाफेडचा भाव हा ७ हजार रुपये असताना देखील केंद्र सुरू नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल भावात विकावा लागत आहे त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे यापूर्वी सततची नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या आहेत परंतु यंदा पीक परिस्थिती सुधारली असली तरी शेतकऱ्यांना भाव पाहिजे तसा मिळत नाही त्यामुळे आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे तर याकडे शासनाने लक्ष देऊन तात्काळ नाफेडचे केंद्र सुरू करून  मुंग, उडीद व सोयाबीन खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच सरकारने कर्जमाफीचे गाजर शेतकऱ्यांना दाखविले मात्र निकष पुढे केले त्यामुळे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला ? हा प्रश्नच आहे. जे शेतकरी निकष पूर्ण करतात त्यांनाही संपूर्ण कर्जमाफी झाली नाही. काही शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचा लाभ अद्यापही मिळालेला नाही त्यामुळे तात्काळ हा लाभ देण्यात यावा, पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही त्यांना तात्काळ पिकविम्याचा लाभ देण्यात यावा तसेच अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचा सर्व्ह करून त्यांना आर्थिक मदत घोषित करावी व शेतकरी हित जोपासवे अशी मागणी यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश प्रतिनिधी दयारामभाऊ वानखडे यांनी केली आहे.






शेगाव प्रतिनिधी उमेश राजगुरे 
आज दि 17/09/2019 रोजी अॅड मा आ आकाशभाऊ फुडकर (आमदार खामगाव मतदार सघ) यांना भोईराज भंवन सुधारण्यासाठी  व भोई समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी निधी उपलब्ध झाला पाहिजे या साठी मा आमदार आकाश दादा फुडकर यांना भोई समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले,मा आमदार आकाशदादा फुडकर हे आपल्या भोई समाजा साठी तत्पर उपस्थितीत असतात त्या वेळी उपस्थितीत म्हणुन भोई समाज बहुदेशिय संस्था चे अध्यक्ष प्रल्हादराव शिरजोशे उपाध्यक्ष विनायक ढोले सचिव आशिष सपकाळ सहसचिव प्रकाश शिरजोशे कोषाध्यक्ष भिकाजी तायडे सदस्य रामदास श्रीनाथ, गजानन श्रीनाथ ,अतीष श्रीनाथ,सागर भारसाकळे,अशोक बावणे,गोपाल भारसाकळे,गोपालभाऊ मात्रे,विनोद श्रीनाथ,विक्की सुर्यवंशी,पुरूषोत्तम मेसरे,दिपक भाऊ मात्रे,श्रीराम श्रीनाथ,अजय भाऊ किरकाळे,अशा प्रकारे समस्त भोई समाज बांधवाची उपस्थितीत होते
                         

            
           
            

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध