Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ सप्टेंबर, २०१९

जळगाव जिल्हा बँकेच्या विविध कर्मचाऱ्यांचे पदोन्नती तसेच सेवा निवृत्ती बद्दलचे सत्काराचे आयोजन




चोपडा:प्रतिनिधी विनोद निकम 
चोपडा शहर व तालुक्यातील विविध जिल्हा बँकेच्या शाखेचे मधील कर्मचाऱ्यांचे झालेली पदोन्नती सेवानिवृत्ती याबद्दल कर्मचाऱ्यांचे सत्काराचे  आयोजन नुकतेच करण्यात आले असून या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आडगाव येथील शाम भागवत पाटील तसेच सत्काराच्या  या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून जळगाव जिल्हा बँकेचे संचालक डॉ सुरेश श्यामराव पाटील उपस्थित होते.
 चोपडा जिल्हा बँकेचे शाखेचे व्यवस्थापक डी बी पाटील यांची नुकतीच उपव्यवस्थापक म्हणून निवड झाली त्याबद्दल त्यांच्या सत्कार यावेळी करण्यात आला तसेच जी बी विंचुरकर, के पी पाटील, व्ही एम पाटील, एस पी नरवाडे, एन आर साळुंखे ,एस यु नेरपगारे याची सेवा समाप्ती बद्दल तसेच कारकून वरून क्लर्क झाल्याबद्दल मुकेश शिंदे,मुकुंदा पाटील,रामकृष्ण सनेर,मंगेश पाटील,याचा सत्कार डॉ सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा बँकेच्या आठ विविध शाखांनी इष्टांक पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.त्यात  चोपडा ,लासुर, वर्डी, अंनवरदे,चहार्डी, मंगरूळ ,चुंचाळे, व अकुलखेडा शाखांचा समावेश आहे.चोपडा तालुका देखरेख संघाचे सचिवपदी निवड झालेले साहेबराव पाटील यांचा देखील यावेळी सत्कर करण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात १०० टक्के वसुली करणारी गोरगावले येथील विकास सोसायटी होती म्हणून त्या गावचे चेअरमन व सचिव याचा देखील सत्कार डॉ सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ सुरेश पाटील यांनी ठेवी वाढविण्यासाठी आवाहन केले असून वसुली देखील वेळेवर आणि शंभर टक्के झाली पाहिजे म्हणून आवाहन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध