Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९
रावेर मध्ये १० नोव्हेंबर ला मराठा समाजाचा वधु वर परिचय मेळावा
(1)
प्रतिनिधी अजीज शेख :रावेर येथील कै.शेनाबाई गोंडु पंडीत मराठा समाज मगंल कारर्यालयात नुकतीच रावेर तालुका मराठा समाज वधु वर परिचय व सामुहिक विवाह सोहळा समितीची बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली बैठकीत सालाबाद प्रमाणे या वर्षीचा वधु वर परिचय मेळावा व रेशीमबंध परिचय सुचीचे प्रकाशन १० नोव्हेबंर ला घेण्याचे एकमताने ठरविण्यात आले .
परिचय पत्रक रावेर येथील योगराज ऑपसेट येथे उपलब्ध करण्यात आलेले आहे.परिचय पत्रक जमा करण्याची अंतीम तारीख १५ ऑक्टोबंर असुन परिचय पत्रकासोबत फोटोची सक्ती करण्यात आली आहे
बैठकीत परिचय समितीचे अध्यक्ष डॉ.सुरेश पाटील,उपाध्यक्ष दत्ता पाटील,कार्याध्यक्ष घन:श्याम पाटील,सचिव प्रशांत पाटील, माजी अध्यक्ष सी एस.पाटील ,विकास मंडळाचे सचिव वामनराव पाटील,दिलीप पाटील,कडू पाटील,
शेतकी संघाचे चेअरमन
पी.आर.पाटील,मॅनेजर विनोद चौधरी,पं स.योगेश पाटील,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के.पाटील,अॅड.धनराज चौधरी,योगेश महाजन,ललीत चौधरी,अंबादास महाजन,कमलाकर पाटील,पकंज पाटील,दिनकर पाटील,राजेश महाजन,विलास ताठे, बबलू सांवत,
सुभाष पाटील, योगेश पाटील,जगदीश चौधरी यांच्यासह समाजबाधंव उपस्थितीत होते
---------------------------------------------
(2)
संभाजी भिडे यांनी केलेलं वक्तव्य पुन्हा ठरले वादग्रस्त.....
-----------------------------------------------
प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत भाषण करतांना कथन केले होते की
आम्हाला युध्दनको भारताने जगाला बुध्द दिला आहे.
प्रधानमंत्रीच्या या कथनावर आज संभाजी भिडे यांनी सांगली येथील दुर्गामाता दौडीच्या वेळी शिवप्रतिष्ठाण संघटनेकडुन वक्तव्य केले कि. ,"प्रधानमंत्री म्हणाले की भारताने जगाला बुध्द दिला, पण बुध्द काही ऊपयोगाचा नाही.
त्याच्या या वक्तव्यामुळे बुध्द अनुयायांच्या भावना दुखावल्यागेल्या
भिडे विरुध्द कारवाई व्हावी म्हणुन राजुभागवत सवर्णे यांनी आज रावेर पो.स्टे.ला संभाजी भिडे विरुध्द तक्रारी अर्ज देवून गुन्हा दाखल करावा अशा अर्ज पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांना दिला.
यावेळी राजु भागवत सवर्णे, आनंदभाऊ बाविस्कर, दिलीप कांबळे, नगरसेवक जगदीश घेटे,बाळु शिरतुरे, पंकजभाऊ वाघ, अडव्होकेट . योगेश गजरे, अॅड.सुभाष धुंदले, अ दिपक गाढे,विनोद वाघोदे,दिपक तायडे सर,ईश्वर जाधव,प्रदीप सपकाळे, दिलीप साबळे, सावन मेढे,सिताराम तायडे,संतोष ढिवरे, साहेबराव वानखेडे,याचे सह समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
आचारसंहिता लागु असताना संभाजी भिडेने आसे वक्तव्य केले त्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करायला हवी...अशा नागरीकांकडून तक्रारी केल्या जात आहे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा