Breaking News बातमी मागील सत्य..!

सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९

प्रतिभा शिंदेंच्या ”लोकसंघर्षा”ला सलाम करीत ”आमू आखा एक”चा दिला नारा



अमळनेर(प्रतिनिधी) शिवाजी पारधी : लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय नेत्या प्रतिभाताई शिंदे यांचा जन्मदिवस अमळनेर शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी रविवारी मोठ्या उत्साहात साजरा केला, मंगळग्रह संस्थानच्या सभागृहात त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या कार्याचा गौरव करीत ”आमू आखा एक”चा उपस्थित कार्यकर्त्यांनी नारा दिला.

-----------------------------------------------------------

कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा चिंतनाने प्रतिभा शिंदेंना आले बळ

-----------------------------------------------------------

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या हक्कासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे लढा देत आहेत. सरदार सरोवर बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक वर्ष त्यांनी संघर्ष केला. त्यानंतर लोकसंघर्ष मोर्चाची स्थापना करून त्यांनी खान्देशात आपला लढा उभारल आहे. आदिवासी बांधवांसह अनेक सामाज विघातकांना विरोध करीत आपला लढा सुरूच ठेवला आहे. नंदुरबार, जळगाव, धुळे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देणे असो अथवा जळगावातील महामार्ग, सामांतर रस्त्यांचे आंदोलन, यासाठी त्यांनी अग्रेसर राहून पुढाकार घेतला आहे. ”आमू आखा एक” चा नारा देताच लाखो आदिवासी बांधव त्यांच्या पाठीशी उभे राहता. म्हणूनच त्यांनी मुंबईच आदिवासी बांधवांसह शेतकऱ्यांचा काढलेल्या मोर्चाची दखल खुद्द मुख्यमंत्र्यांनाही घ्यावी लागली होती. चाकरमान्यांच्या या शहरात अत्यंत शिस्तबद्ध आणि कायदासुव्यवस्थेला कोणताही धक्का न लागू देता काढल्याने त्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरवण्यात आले आहे. त्या वर्षाचे ३६५ दिवस उन, वारा, पावसाची तमा न करता निडरपणे पिचलेल्या दिनदलितांच्या अन्यायाविरुद्ध लढत असतात. म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी एक आनंद सोहळाच असतो. रविवारी मंगळग्रह संस्थानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. तसेच यावेळी प्रा. अशोक पवार, नरेंद्र पाटील, पन्नलाल मावळे, संजय पवार मच्छीवाले,संजय पाटील पत्रकार, महेंद्र रामोशे, ”खबरीलाल”चे संपादक जितेंद्र ठाकूर यांनीही त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध