Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २२ सप्टेंबर, २०१९

टॉयलेटला जाताना मोबाईल फोन सोबत घेऊन जाता? थांबा! आधी हे वाचा…


मोबाईल फोन हा आता आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. आपण कुठेही जाता-येताना, काही काम करत असताना मोबाईल फोन हा नेहमी आपल्या सोबत असतो. गेल्या काही वर्षात मोबाईल फोनचा वापर हा तरुणाईमध्ये अधिक वाढला आहे. काही जण टॉयलेटला जातानाही आपल्यासोबत मोबाईल फोन घेऊन जातात. तुम्ही जर टॉयलेटला जाताना आपल्यासोबत आपला मोबाईल फोन घेऊन जात असला तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

अनेक जण इंग्लिश बनावटीच्या टॉयलेटमध्ये जाताना मोबाईल फोन सोबत घेऊन जातात आणि बराच वेळ मोबाईल फोन चाळत टॉयलेट सीटवर बसून राहतात. मात्र ही बाब आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशी सवय असलेल्या व्यक्तींना मूळव्याधाची व्याधी होऊ शकते. ब्रिटनमधील ‘YouGov’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार,  57 टक्के ब्रिटिशांनी शौचालयात आपला फोन वापरल्याची कबुली दिली असून 8 टक्के लोकांनी ते नेहमी मोबाईल फोन आपल्यासोबत टॉयलेटमध्ये घेऊन जातात, असे म्हटले आहे. यामधील बऱ्याच लोकांना मूळव्याधाचा त्रास झाल्याची बाब यामधून समोर आली आहे.

ही आहेत लक्षण – 

  • मल निःसारणानंतर शौचालयामध्ये रक्ताचा थारोळा पडणे.
  • गुदद्वारापासून म्यूकस सुटणें.
  • गुदद्वाराभोवतील भागाची खाज, लालसरपणा किंवा अशान्ती जाणवणें.
  • मलनिःसारणानंतर सुद्धा पोटात मल असल्यासारखे वाटणे
  • मलनिःसारणाच्या वेळी वेदना

जर तुम्हालाही असाच त्रास जाणवत असेल तर त्वरित एकाद्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी व उपचार करून घ्यावे. यापुढे मोबाईल फोन टॉयलेटमधे घेऊन जाण्याआधी नक्की याचा विचार करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध