Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०१९
गणेश विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू घडल्याची घटना
प्रतिनिधी बाबू मण्यार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वडछील गावात घडली आहे. विसर्जनासाठी गेले असताना तरुणांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सर्व तरुणांचे मृतदेह मिळाले असून म्हसावाद ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
सध्या राज्यात सर्वत्र गणपती आगमनाची धामधुम आहे. पण काही ठिकाणी 5 दिवसांचा गणपती बसतो, आणि याच गणपतीचे विसर्जन सध्या सुरू आहे. जिल्ह्यातही पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले जात होते. त्यामुळे गावातील चित्रकथे कुटुंबातील मुले बाप्पाच्या विसर्जनासाठी गेले होते. यावेळी विसर्जनासाठी बाप्पाला पाण्यात घेऊन गेले, मात्र अचानक खोल पाणी असल्याने सर्व मुले बुडाले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या तरुणांमध्ये कैलास संजय चित्रकथे,वय( 19) सचिन सुरेश चित्रकथे,(19) रविंद्र शंकर चित्रकथे,(29) विशाल मंगल चित्रकथे,(17) दीपक सुरेश चित्रकथे (21) आणि सागर आप्पा चित्रकथे (20)या तरुणांचा समावेश आहे. दरम्यान, तरुणांच्या या अकस्मात मृत्यूमुळे गावातील नागरिकांना सुन्न केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा