Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९
आर्वी येथील शेतकऱ्यांना हुमनी आळी बंदोबस्ता बाबत मार्गदर्शन*
प्रतिनिधी निखिल राजपूत:आर्वी - येथील डोंगरे मळ्यात, 'ग्रामीण कृषि कार्यानुभव' कार्यक्रमा अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथून आलेल्या कृषिदूतांनी, या भागातील ऊस शेतकऱ्यांसमोर हुमनी आळी या महत्वाच्या ऊस-किडी बाबतीत मार्गदर्शन केले. हुमनी आळी ऊसाच्या मुळ्यांना पोखरून मुळे ठिसूळ करून ऊसाचे १० -१५ % नुकसान करते. पावसाळ्याच्या सुरूवातीला या आळीचे भुंगेरे तयार होऊन त्यांचे प्रजनन होते. या आळीचा बंदोबस्त करण्यासाठी, कृषिदूतांनी शेतकऱ्यांना 'लाईट ट्रॅप' बनविण्याचे सुचवले. पावसाळ्यात, जमिनीतून रात्रीच्या वेळी बाहेर येणारे हे भुंगेरे, 'लाईट ट्रॅप' कडे आकर्षित होऊन त्याखाली असलेल्या रॉकेल मिश्रित पाण्यात पडून मरतात व त्यामुळे शेतातील हुमणी आळीचे प्रमाण कमी होते तसेच शेतकऱ्यांचे होणारे नुकसानही टळते. शिवाय हा ट्रॅप बनवायला अगदी सोप्पा व परवडणारा असल्याचेही कृषिदूतांनी सांगितले.
यावेळी शुभम करपे, आकाश साबळे, ऋषीकेश काळे, राघव रेड्डी व गौरव पाटील या कृषि दूतांनी मार्गदर्शन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : प्रतिनीधी आदिवासी बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील एकलहरे येथे १३ रोजी सकाळी १० वाजता रस्त्यावरील...
-
शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर शहर हद्दीत आज प्रतिबंधित चायना/नायलॉन मांजा जवळ बाळगताना व विक्री करताना दोन दुकानदार रंगेहाथ पकडण्यात आले. या प्र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा