Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ सप्टेंबर, २०१९
आर्वी येथील शेतकऱ्यांना 'व्हर्मी कम्पोस्ट' बाबत मार्गदर्शन
पुणे प्रतिनिधी - निखिल राजपूत
आर्वी - येथील डोंगरे मळ्यात, आज, ग्रामीण कृषि कार्यानुभव' कार्यक्रमा अंतर्गत कृषि महाविद्यालय, पुणे येथून आलेल्या कृषिदूतांनी, शेतकऱ्यांना सेंद्रीय ख़त निर्मितिच्या 'व्हर्मी कम्पोस्ट' या पद्धतीची माहिती दिली. त्यांनी कम्पोस्टिंगची पद्धत व त्याचे फायदे चार्ट द्वारे समजावले. पिकांचे अवशेष, पलापचोळा, शेण, गोठ्यातील सरव, इ. सेंद्रिय पदार्थांपासून गांडूळांच्या मदतीने उत्तम प्रकारचे खत व्हर्मी
कम्पोस्टींग ने ६०-१०० दिवसात तयार करता येते, असे यावेळी कृषीदुतांनी सांगितले. तयार होणाऱ्या खातातून २.२% नत्र, १.६% स्फुरद व ०.८% पालाश मिळते असेही त्यांनी सांगितले. ''घरगुती सेंद्रिय पदार्थांपासून व्हर्मी कम्पोस्टींगने खत तयार करणे सोप्पे असून त्याने रासायनिक खातांवरील होणारा अवाढव्य खर्च कमी होऊ शकतो तसेच जमिनीची निगा देखील राखली जाऊ शकते'' असे गावातील एक प्रगतशील शेतकरी अशोक डोंगरे यावेळी म्हणाले.
यावेळी शुभम करपे, आकाश साबळे, ऋषीकेश काळे, राघव रेड्डी व गौरव पाटील या कृषि दूतांनी मार्गदर्शन केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा