अहमदनगर ( प्रतिनिधी ) संपुर्ण जगात नावलौकिक असणाााऱ्या World Constitution and Parliament Association या संस्थेत भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राचे थोर व्यक्तीमत्व व अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्याचे वैभव डाॅ विजय महाराज तनपुरे यांची नुकतिच नियुक्ती करण्यात आली. तसे पत्र जागतिक संसदेचे अध्यक्ष डाॅ.ग्लेन मार्टिन यांनी देऊन नुकतेच कळवले आहे.
विशेष म्हणजे या संसदेत 160 देशातील सदस्यांचा सहभाग आहे.या वर्षी भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याला मिळाला ही आपल्या साठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे.
शिवाजी महाराजांचे कार्य आपल्या पहाडी आवाजाने पोवाड्या च्या रूपाने जगाच्या काना कोपर्यात नेणारे शिवशाहीर डाॅ विजय महाराज तनपुरे यांनी आधीच आपले आयुष्य समाजासाठी आणि विषेष म्हणजे दिव्यांगासाठी अर्पण केले आहे त्यातच आता आणखी एक मोठी जबाबदारी त्यांना मिळाल्यामुळे एवढ्या मोठ्या संसदेवर भारताचे प्रतिनिधित्व करून भारतीय संस्कृती व शिवरायाचे विचार जगाच्या पाठीवर पोहचवुन देशसेवा करण्याचे भाग्य मला लाभले असे डाॅ.विजय महाराज तनपुरे यांनी म्हटले आहे.अनाथ आणि दिव्यांगासाठी संजीवनी असणार्या शिवाश्रमा चे येत्या 25 डिसेंबर रोजी लोकार्पण करून महाराज अमेरिका साठी रवाना होणार आहे.आणि आपली संस्कृती शिवारायांचे विचार जगात पोहचवण्यासाठी या संस्थेचे फार मोठे व्यासपीठ असेल असा विश्वास त्यांना आहे.25 डिसेंबर रोजी लोकार्पण सोहळ्यासाठी सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती व सर्वांना आग्रहाचे निमंत्रण असे आवाहन शिवाश्रमाच्या वतीने तनपुरे महाराजांनी केले आहे.महाराष्ट्राच्या सुपुत्राची नियुक्ती झाल्याबद्दल महाराष्ट्रातुन त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा