Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ सप्टेंबर, २०१९

आजपासून उत्सवरात्री




नवरात्रीवर यंदा पावसाचे सावट असले तरी सणांच्या रंगांपासून खान्देशकर स्वतःला वेगळे ठेवू शकत नाहीत. नवरात्री हा तर मनमुराद नाचण्याचा, रंगांमध्ये सजण्याचा सण असल्याने त्यासाठी खान्देशने  जय्यत तयारी केली आहे. आज, रविवारपासून जागोजागी गरबा आणि दांडिया रंगेल व उत्सवरात्री सुरू होतील.

नवरात्रीवर यंदा पावसाचे सावट असले तरी सणांच्या रंगांपासून खान्देशकर         स्वतःला वेगळे ठेवू शकत नाहीत. नवरात्री हा तर मनमुराद नाचण्याचा, रंगांमध्ये सजण्याचा सण असल्याने त्यासाठी खान्देशात जय्यत तयारी केली आहे. आज, रविवारपासून जागोजागी गरबा आणि दांडिया रंगेल व उत्सवरात्री सुरू होतील.
यंदा मंदी आणि पावसाचा सणांवर परिणाम झाला आहे. मात्र रोजच्या धावपळीतून आनंदाचे चार क्षण नवरात्रीत नक्कीच मिळतात. गरबा खेळण्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा साठवण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. आता पुढील नऊ रात्री अनेक खान्देशकर चनिया, घागरा, कुर्ते, इंडो-वेस्टर्न कपडे घालून खान्देशला आपल्या अनोख्या रंगांमध्ये रंगवणार आहेत. नवरात्रीनिमित्त खरेदीसाठी शनिवारी स्थानिक बाजारपेठांमध्ये गर्दी झाली होती. घागरा, रंगीत जॅकेट, चमकदार ब्लाऊज, कुर्ते यांच्या स्टॉलला गराडा होता. पावसाचा फटका फुलबाजाराला बसला असला तरी घरी घट बसवणाऱ्यांची फुलबाजारात गर्दी होतीच. शनिवारी अनेक मंडळांच्या देवीच्या मूर्ती मंडपांमध्ये स्थानापन्न झाल्या.

मंदीचा सामना करत उत्सवाच्या उत्साहाला ओहोटी लागू न देता देवीसाठीही भव्य सजावट करण्यात आली आहे.अशा अनेक मंडळांनी नेहमीप्रमाणे भव्यतेची परंपरा कायम राखली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसह फोटोग्राफी, व्हिडीओग्राफीच्या स्पर्धांचेही आयोजन केले आहे. सणांची परंपरा जपण्यासोबत या मंडळांनी सामाजिक भानही जपले आहे. अनेक मंडळांनी पश्चिम महारष्ट्रातील पूरग्रस्त भागात जाऊन आर्थिक, जीवनावश्यक वस्तूंची मदत स्वतः सुपूर्द केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध