Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ : चोपड्यात एकमेकींना पेढा भरवून व्यक्त केला आनंद





चोपडा प्रतिनिधी दीलीप पाटील 
आशा कर्मचारी व गटप्रवर्तक संघटनेचे
जिल्हाध्यक्ष काॅ.अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली आशा कर्मचाऱ्यांनी जळगाव येथे ९ ते १७ सप्टेंबर काळात एका आठड्यात तीन जोरदार आंदोलने केली. अशीच आंदोलने संघटनेने राज्यभर करून सरकारने मानधन वाढीचा आदेश काढावा म्हणून दैनंदिन कामावर बहिष्कार घातला.आशा कर्मचाऱ्यां च्या आंदोलनाने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला.शेवटी राज्य सरकारला १६ सप्टेंबर रोजी आशांच्या मानधनवाढीचा आदेश काढावा
लागला.आंदोलन रेटून ठेवल्याने आशांना प्रतिमाह २५०० ते ३०००/-रुपये वाढ देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने चोपड्यात
आशा व गटप्रवर्तकांनी एकमेकींना पेढा भरवून
आनंद व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून,उद्या १९ रोजी पासून कामावरील बहिष्कार मागे घेतला.गेल्या
बारा वर्षात पहिल्यांदा सरकारने आशांच्या मानधनात वाढ केली आहे.

 यावेळी गोरगावले, लासूर,धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे थकित मोबदला व व्हिएचएनसीचे अनूदान मिळावे.तसेच जेएसवाय केसेसची आशा ५/६ महिने काळजी घेते आणि ऐन वेळेस काही नर्सेस त्या महिलांना भूलथापा देऊन कूटूंब नियोजन केसेस हायजॅक करतात ते बंद करण्यात यावे याबाबत पंचायतसमितीचे तालूका वैद्यकीय अधिकारी डाॅ.लासूरकर यांना आशा व गतप्रवर्तक कर्मचाऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनावर आशा प्रतिनिधी मीनाक्षी सोनवणे,वंदना पाटील, शितल पाटील,वंदना सोनार,आक्का पावरा शालीनी पाटील, शरिफा तडवी,अलका पाटील रत्ना शिरसाठ,मिना चौधरी, संगिता मराठे, मनिषा पाटील, शोभा पाटील,सरला बाविस्कर उषा सोनवणे आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध