Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९

चोपडा तालुक्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जनजागृती मोहिमेला प्रारंभ







चोपडा(प्रतिनिधी) दीलीप पाटील    
आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक  पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती मोहीम राबविण्याबाबत निर्देश दिलेले असून सदर निर्देशांचे अनुषगाने चोपडा विधानसभा मतदारसंघांतर्गत चोपड्या तालुक्यात व्हीव्हीपॅट  आणि ईव्हीएम जनजागृती मोहिमेस दि ४ सप्टेंबर रोजी चोपडा तहसीलदार अनिल गावित,निवडणूक नायब तहसीलदार राजेश पउळ ,नायब तहसीलदार जितेंद्र पंजे , पुरवठा अधिकारी संजय इखनकर जनजागृती पथकात नियुक्त सदस्य,पोलीस कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत चोपडा तहसील कार्यालयात प्रारंभ करण्यात आला. 

सदर जनजागृती मोहिमेअंतर्गत चोपडा विधानसभा मतदारसंघात असलेल्या सर्व ३१८ मतदान केंद्र असलेल्या गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट बाबत जनजागृती करण्यात येणार आहे. सदर प्रसंगी नियुक्त पथकातील प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत जनजागृती व प्रशिक्षण प्रयोजनार्थ उपलब्ध करून दिलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट द्वारे  प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून मतदारांना प्रत्यक्ष मतदान करून मतदान प्रक्रिया समजून घेण्याची संधी असणार आहे. या मोहिमेबाबत चे वेळापत्रक तसेच जनजागृती व प्रशिक्षण प्रयोजनार्थ वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा तपशील चोपडा तालुक्यातील सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना कळविण्यात आला असून प्रत्येक गावात दवंडी देऊन सदर मोहिमेबाबत पूर्वसूचना देण्यात येत आहे .सदर मोहीम सुमारे २० दिवस सुरू राहणार असून यात  तालुक्यातील २५२ मतदान केंद्र असलेल्या गावांमध्ये दोन मोबाइल व्हॅन व पथकांद्वारे जनजागृती करण्यात येऊन त्यानंतर यावल तालुक्यातील चोपडा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या उर्वरित ६६ मतदान केंद्र असलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

जनजागृतीकरिता निश्चित केलेल्या ठिकाणी नागरिकांनी व सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून ईव्हीएम व  व्हीव्हीपॅटद्वारे पार पाडण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रिया  पथकातील प्रशिक्षित कर्मचाऱयांकडून समजून घेऊन मतदान यंत्रावर प्रत्यक्ष मतदान करून पाहावे असे चोपडा तहसीलदार अनिल गावित यांनी नागरिक व राजकीय पक्षांना आवाहन केलेले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध