Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९
पवारांवरील 'इडी' कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीतर्फे बोदवडातं कडकडीतं बंद ...
प्रतिनिधी समिर पिजारी बोदवड दी 26 राज्याचि शिखर बँक म्हणुन ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने हजारो कोटी रुपयांचि नियमबाह्य कर्जे २००१ ते २०१३ या कालावधित वितरित केली होती. त्यामुळे बँकेला २ हजार ६१ कोटी रुपयांचा फटका बसला होता. राज्य सहकारी बँकेच्या कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ज्येष्ठ नेते शरद पवारांवरही इडी ने गुन्हा दाखल केल्यानंतर राजकिय वातावरण ढवळुन निघाले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब यांना इडी ने पाठवलेल्या नोटीसीच्या निषेधार्थ बोदवडात दुपारी १२ वाजेपर्यंत कडकडीत बंद पाडण्यात आला. याबाबतचे आवाहन पुर्व संध्येला कार्यकर्त्यांकडुन करण्यात आले होते. महाराष्ट्र सहकारी बँक कथित घोटाळ्याप्रकरणात कोणताही संबंध नसताना शरदचंद्रजी पवार यांच्यावर भाजपा सरकार सुडबूध्दीने कारवाई करीत असल्याचा ठपका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनि ठेवला. कारवाईच्या निषेधार्थ आज बोदवड शहरात 100% कडकडीत बंद १२ वाजेपर्यंत पाळण्यात आला. ‘एकच साहेब पवार साहेब’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्यांनी निषेध व्यक्त केला._
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
चोपडा (प्रतिनिधी) सोशल मीडियाच्या माध्यमातून जुळलेल्या प्रेमप्रकरणाचा अंत अत्यंत भयानक आणि रक्तरंजित झाला आहे. चोपडा तालुक्यातील अकुलखेडा ये...
-
शिरपूर प्रतिनिधी:- सातारा येथील सोन्याच्या व्यापाऱ्यावर दरोडा टाकून सोन्यासह मध्यप्रदेशाकडे पळ काढणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या शिरपूर पोलिसा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा