Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २९ सप्टेंबर, २०१९
कुरखळीत स्वच्छता भारत अभियान अंतर्गत स्वच्छता कार्यक्रम संपन्न
कुरखळी प्रतिनिधी - योगेश्वर मोरे
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र धुळे व स्व अण्णासो दरबारसिंग रामसिंग राजपूत प्रतिष्ठान भावेर व कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कुरखळी गावात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली यात ग्रामपंचायत परिसर , गुरांसाठी पाण्याचा हाळ यासह परिसरात २० हुन अधिक युवकांनी जागो जागी स्वच्छता केली. त्यात पोस्टर प्रदर्शन, घरोघरी जाऊन स्वच्छता विषयावर महत्त्व पटवून दिले.
सोशल मीडियावर व्हाट्सअप्प ग्रुप च्या माध्यमातून वेळोवेळी स्वच्छतेची यशोगाथा मांडणारा व वसा जोपासणारा कुरखळी विकास मंच हा ग्रुप यावेळी चर्चेत राहून कौतुकाचा विषय ठरलेला आहे. कुरखळी सह परिसरात स्वच्छता भारत अभियान, ग्रामविकास कार्यक्रम, ग्रामीण भागातील पाणी प्रश्न व त्यावर उपाय, शालेय पोषण आहार, तंबाखू मुक्त शाळा व परिसर, बेटी बचाव बेटी पढाव, यासोबत गावातील तरुण, ग्रामस्थ व महिलांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांवर व्हाट्सअप्प ग्रुप च्या माध्यमातून तोडगा काढला जातो, यासाठी कुरखळी ग्रामपंचायतीचे अनमोल सहकार्य लाभते. यासारख्या अनेक समस्यांचे निराकरनात ग्रुप चा सक्रिय सहभाग असतो आणि राहील असे प्रतिपादन कुरखळी ग्राम सर्वांगीन विकास मंचचे प्रमुख योगेश्वर मोरे यांनी केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष भटेसिंग राजपूत, कुरखळी ग्राम सर्वांगीण विकास मंचचे प्रमुख योगेश्वर मोरे, संगणक परिचालक संघटनेचे सदस्य सचिन मोरे, सिताराम भिल, ग्रा. पं. स्वच्छता व पाणी पुरवठा कर्मचारी रोकड कोळी, चेतन मोरे, आकाश कोळी, रोहित कोळी, स्वप्नील कोळी, महेंद्र अलकरी, मुकेश अलकरी, यांचे सह कुरखळी ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार अमळनेर शहरात गुरुवारी पहाटे राबविण्यात आलेल्या विशेष कोम...
-
▶ वणी प्रतिनिधी : राज्य उत्पादन शुल्क कळवण विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.१) मुंबई-आग्रा महामार्गावर गुरुव्दाराचे समोर मंगरुळ फाटा मंगरुळ (ता...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा