
अमळनेर:प्रतिनिधी शिवाजी पारधी :शरद पवार यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढून निवेदन देणार्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना चांगलेच भोवले आहे. आचारसंहिता सुरू असल्याने अनिल भाईदास पाटील यांच्यासह २० ते २५ जणांवर आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभा निवडणुक जाहीर झाल्याने जिल्हाधिकाऱयांनी आचारसंहिता जाहीर झाल्यापासून प्रतिबंधात्मक १४४ (१)(२)(३) कलम लागू केले असून २५ रोजी अनिल भाईदास पाटील व इतर २० ते २५ कार्यकर्त्यांनी घड्याळ चिन्ह असलेले फटके गळ्यात घसळून शरद पवार यांच्या विरुद्ध ईडी चा गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून शासनाचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढून प्रांताधिकारी सीमा आहिरे याना निवेदन देण्यासाठी आले होते. याप्रकरणी भरारी पथक प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षक अविनाश शिवाजीराव खैरनार यांनी अमळनेर पोलिसात आचारसंहिता भंग झाल्याची फिर्याद दिल्यावरून भादवी कलम १८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे अनिल पाटील व २५ जंणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा