Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १९ सप्टेंबर, २०१९
देशात आणि राज्यात अघोषित आणीबाणी :अरूणभाई गुजराथी
चोपडा प्रतिनिधी विनोद निकम: देशात श्रीमती इंदिरागांधी पंतप्रधान असतांना एकदा आणीबाणी लागली होती,पण ती आणीबाणी घोषित करून लावली हाती.आज संपूर्ण देशात राज्यात भीतीचे वातावरण आहे येतो आमच्या पक्षात की चौकशी लावू असा हुकूमशहा प्रकार सुरू आहे तरूण बेरोजगार झाला आहे, शेतकरी हवालदिल झाला आहे त्याला कर्ज माफी नाही त्याच्या शेतमालाला हमीभाव नाही एक कोटी नोकऱ्या मागच्या फक्त एक वर्षात कमी झाल्या आहेत
वाहन,केमिकल,सोने चांदी कापड उद्योग,कारखाने सारे उद्योग आर्थिक मंदीचा सामना करता आहेत आणि हे सरकार फक्त थापा मारते आहे राज्याचे मुख्यमंत्री हे केवळ अभ्यास करत असून कुठलाही विधायक निर्णय घेत नाही त्यामुळे देशात आणि राज्यात अघोषित आणीबाणी असल्याचे गंभीर मत महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी व्यक्त केले ते चहार्डी येथे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार जगदिशभाऊ वळवी यांच्या प्रचारासाठी आयोजित छोटेखानी सभेत बोलत होते पुढे बोलतांना अरूणभाई म्हणाले की या सरकारची दडपशाही मोडून काढायची असेल तर हे सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येता कामा नये शेतकऱ्याचे भूमीपुत्रांचे तरुणांचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यासाठी आपण शरद पवार यांच्या पाठीशी उभे राहीले पाहिजे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार निवडून दिले पाहिजे त्याची चांगली सुरुवात चोपड्या पासून करा जगदीशभाऊ वळवी यांना प्रचंड मतांनी निवडून दया असे आवाहन याप्रसंगी त्यांनी केले .यावेळी आपल्या भाषणात बोलतांना जगदीशभाऊ म्हणाले की,काही इच्छुक उमेदवार माझ्यावर मी नंदूरबारचा आहे बाहेरचा आहे अशी टीका करतात पण त्यांना मी सांगू इच्छितो त्यांच्या जन्माच्या आधीपासून माझे या चोपडे गावात खरेदीखत झाले आहे.बारावी नंतर बी ए पर्यंतचे शिक्षण मी चोपडा कॉलेजला घेतले आहे. पद, पैसा,प्रतिष्ठा चोपडेकरांनीच मला मिळवून दिली आहे त्याची उतराई करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात मी आमदार असतांना केला आहे माझ्या पाच वर्षांच्या काळात आदिवासी बांधवांना तीन वेळा खावटी कर्ज मिळून ते माफ देखील केले होते शेळ्या,मेंढ्या,गाई,म्हशी,घर साहित्य,रस्ते,पूल,केटीवेअर बंधारे,सभामंडप, असे कोट्यावधी रुपयांचे विकास कामे केलीत पण गाजावाजा आणि जाहिरात केली नाही आजचा जमाना जाहिरातीचा आहे आदिवासी भागात छोटेशे काम असेल तर त्याच्या भुमुपूजनाचे ब्यानर पार यावल तालुक्यात लावले जातात म्हणजे आता काम कमी आणि बोभाटा जास्त असा सर्व प्रकार सुरू आहे मागची पाच वर्षे तालुक्याने कशी भोगलीत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आता पुन्हा तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो तर सर्वप्रथम पाणी अडवा पाणी जिरवा या कामाला प्राधान्य दिले जाईल कारण यावर्षी पाण्याचे चटके सर्वात जास्त चोपडा तालुक्याच्या जनतेने सोसले आहेत चोपडा तालुक्यात
शांतता,सुव्यवस्थता,रोजगार,पाहिजे आहे म्हणून मला निवडून द्या अशी विनंती लोकप्रिय माजी आमदार जगदीशभाऊ वळवी यांनी केली .चहार्डी गावातील श्रीदत्त दूध उत्पादक संस्थेच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत चोसाका माजी चेअरमन घनशाम आण्णा पाटील यांनीही आपले विचार मांडले सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष तथा पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी केले यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील,चहार्डी गावातील भरत पाटील,दिनकर त्र्यंबकराव पाटील जगदीश निंबा पाटील,विनायक संतोष पाटील,संजीव गुलाबराव पाटील,समाधान बापूसाहेब पाटील,मंगा शामु कंखरे, ललित दोधा सोनवणे,भगवान ओंकार मोरे,आदी ग्रामथ हजर होते .यावेळी गावातील भिल्ल वस्तीत जावून तिथल्याही समस्या जाणून घेण्यात आल्या भिल्ल वस्तीतही सभा घेण्यात यावेळी सेवा निवृत्त मुख्याध्यापक जीवन लखा पवार,रमेशबापू ठाकूर,अंबर भिल,सुरेश भिल,रतीलाल भिल,दुर्योधन भिल,प्रकाश भिल,रामभाऊ भिल आदी हजर होते
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रेयसीला शेवटचा व्हिडीओ कॉल -बनावट नावाने लॉज मध्ये राहिला अमळनेर : गुजरात मधील अहमदाबाद मधील पोस्को चा गुन्हा दाखल असलेल्या एका आरो...
-
अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज चमकल्याने घोड्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळी अ...
-
मोटरसायकल वर दूध वाहून नेणाऱ्या जानव्याच्या भाग्यश्रीचे अपघाती निधन अमळनेर : वडिलांच्या व्यवसायात हातभार लावून पित्यासाठी ‛भाग्यश्री’ ठर...
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
शिरपूर प्रतिनिधी : परिस्थिती सोबत संघर्ष करीत पत्रकार गणेश जैनांनी पाहिलेले स्वप्न त्यांची लेक तनिष्का जैन हिने दहावीच्या गुणवत्ता यादीत यत...
-
शिरपूर प्रतिनिधी : शिरपूर कृषि उत्पन्न बाजार समिती येथून १९ मे २०२५ रोजी सकाळी ८ वाजता सर्वपक्षीय, सर्वधर्मीय, जिल्हास्तरीय तिरंगा यात्रा आय...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा