Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

जळगावात १३ रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा


जळगाव : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप-सेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 तारखेला जळगाव जिल्ह्यात येत आहेत. जळगाव शहरात त्यांची भव्य जाहीर सभा होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजप-सेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 13 तारखेला जळगाव जिल्ह्यात येत आहेत. जळगाव शहरात त्यांची भव्य जाहीर सभा होणार असल्याची माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी आता प्रचाराचे नियोजन सुरु आहे. सोमवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस झाल्यानंतर लढतींचे चित्र स्पष्ट होईल. मंगळवारी विजयादशमी अर्थात, दसऱ्याचा उत्सव असून त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराचा धूमधडाका सुरु होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचारार्थ अनेक स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय नेते, राज्यातील नेत्यांचा त्यात समावेश आहे. मोदी रविवारी (ता.13) जळगाव जिल्ह्यात येणार असून जळगाव शहरात त्यांची जाहीर सभा होईल. सभेचे ठिकाण अद्याप निश्‍चित नसले तरी दोन-तीन दिवसांत ते निश्‍चित करुन सभेचे नियोजन करण्यात येणार आहे, असे श्री. महाजन यांनी सांगितले. ही जाहीर सभा ऐतिहासिक ठरविणार असल्याचा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध