Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ६ ऑक्टोबर, २०१९

हिसाळे येथे गटारी १ दिवसाचे मृत अर्भक सापडले




शिरपूर(प्रतिनिधी)   संतोष पावरा : तालुक्यातील हिसाळे येथील जिल्हा परिषद मराठी शाळे जवळच्या गटारीत एक दिवसाचे पुरुष जातीचे मृत अर्भक आढळल्याने गावात खळबळ माजली आहे.विद्यार्थी १० वाजता शाळेत आले असता कापडात गुंडाळून गटारीत बाळ पडलेले त्यांच्या लक्षात आले.ही वार्ता गावात पसरताच बघ्यांची गर्दी जमली होती.तात्काळ सामाजिक कार्यकर्ते रामेश्र्वर पाटील व मोतीलाल परदेशी (पोलिस पाटील) यांनी मराठी शाळेजवळ धाव घेतली.तात्काळ थाळनेर पोलीस स्टेशनला कळविण्यात आले.स.पो.नि सचिन साळुंखे कर्मचा-यांसह हजर झाले.  पोलीस हवालदार रफीक शेख व दिलीप कांबळे यांनी पंचनामा केला आहे.अनैतिक संबंधातुन‌ हे कृत्या झाले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मृत अर्भक गोंडस असल्याने महीला वर्गात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत बाळ शव विच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालय शिरपूर येथे पाठविण्यात आले. सा.पो.निरीक्षक सचिन साळुंखे यांचा मार्गदर्शना खाली पुढील तपास सुरु आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध