Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

भुसावळ येथे नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांचा गोळीबार गोळीबारात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू.



भुसावळ येथील भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या कुटुंबावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला असून या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. व इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. 

मृतांमध्ये नगरसेवक रवींद्र उर्फ हम्प्या बाबुराव खरात, त्यांचे बंधू सुनील बाबुराव खरात, मुलगा सागर व रोहित उर्फ सोनू रवींद्र खरात यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे . 

दिनांक 6 रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी रवींद्र खरात यांच्या घरासमोर येऊन अंदाधुंद गोळीबार केला या दोघांच्या जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

नगरसेवक रवींद्र खरात यांना गोळीबारानंतर उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. तरी त्या घटनेत नगरसेवक रवींद्र खरात यांची पत्नी एक मुलगा यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. 

घटनास्थळी पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले दाखल झाले आहे. हा हल्ला नेमका कोणी व का केला याबाबत मात्र अद्यापही कारण कळाले नसून या घटनेने मात्र भुसावळ शहरात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध